मुंबई : साजिद नाडियाडवालाच्या नमह पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेल्या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचे पहिले रोमँटिक गाणे 'नसीब से' रिलीज झाल्यानंतर अनेकजण या गाण्याला ऐकत असल्याचे दिसून येत आहे. कारण युटुबवर या गाण्याला 4 तासत 51हजार लाईक मिळाल्यामुळे हे गाणे त्याच्या चाहत्यांना पसंतीला पडले आहे असे दिसून येत आहे. शिवाय रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंड करत आहे. चाहते चित्रपटाच्या आणखी झलकांची आतुरतेने वाट पाहत आहे.
पुन्हा एकदा एकत्र झळकणार कार्तिक आणि कियारा: कार्तिक आणि कियारा यांच्यातील सुंदर केमिस्ट्रीमुळे आणि काश्मीरच्या नयनरम्य लोकेशन्समुळे हे गाणे प्रशंसा मिळवत आहे. कार्तिक आणि कियाराने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गाणे शेअर केले आहे. चाहते व्हिडिओमधील दोघांच्या उपस्थितीची तुलना ही डिडिएलजे मधील शाहरुख आणि काजोल यांच्याशी करत आहेत. अलीकडे कियाराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर गाण्याच्या शूटमधील बीटीएसचे फोटो शेअर केले होते. यापुर्वी देखील कार्तिक आणि कियारासोबत 'भूल भुलैया 2'मध्ये काम केले आहे. हा चित्रपट 2022 च्या ब्लॉकबस्टर होता. आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाद्वारे एकादा पुन्हा दोघे एकत्र आले आहे.