मुंबई :अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दासने 'झ्विगाटो' या चित्रपटासाठी ऑस्कर लायब्ररी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित मार्गारेट हेरिक लायब्ररीमध्ये स्थान मिळविले आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल न करु शकणाऱ्या या चित्रपटाने मात्र कमालीची कामगिरी आता केली आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने प्रतिष्ठित ऑस्कर लायब्ररीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ही लायब्ररी जगभरातील चित्रपटांच्या संग्रहासाठी ओळखली जाते. ऑस्कर लायब्ररीसाठी चित्रपट निवडण्याची प्रक्रिया फार अवघड असते. कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाने ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळवल्याने तो फार आनंदी आहे.
झ्वियागाटो चित्रपट : झ्वियागाटोसह, ऑस्कर लायब्ररीमध्ये एक डझनहून अधिक भारतीय चित्रपट आहेत, या चित्रपटाना क्युरेट करण्यासाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस खूप प्रयत्न केले. मार्गारेट हेरिक लायब्ररीतील संग्रहाचा भाग बनण्यासाठी चित्रपट कसे निवडतात ही एक मनोरंजक प्रक्रिया आहे. निवडीच्या टप्प्यांमधून दास यांचे नवीनतम कार्य ही एक गौरवास्पद कामगिरी आहे कारण ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळविलेल्या भारतीय चित्रपटांची संख्या एकीकडे मोजता येऊ शकते. कारण फार कमीच चित्रपटाची निवड या लायब्ररीमध्ये होते.
नंदिता दासने साधला ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाना : 'झ्विगाटो' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर अजूनही प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिता दास निराश आहे. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाणा साधत म्हटले, 'आशा आहे की ओटीटी प्लॅटफॉर्म देखील हे सर्व वाचत असेल! मला वाटते आता की हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्याला मिळावा. या सन्मानासाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचे आभार!' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर कपिल शर्माने देखील इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करून अकादमीचे आभार मानले आणि हा सन्मान असल्याचे म्हटले. या चित्रपटाची कहाणी अशी आहे की, ओडिशामधील एक जोडपे बेरोजगारीने फार निराश असतात त्यामुळे ते जगण्यासाठी काय प्रयत्न करतात हे या चित्रपटात रेखाटले आहे. याशिवाय हे जोडपे आर्थिक संघर्ष कसा करतात हे देखील चांगल्या रित्या या चित्रपटात मांडला गेले आहे.