महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नंचियाम्मा बनली राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली आदिवासी गायिका - नंचियाम्मा गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार

केरळमधील आदिवासी गायिका- नंचियाम्मा यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गायिका नंचियाम्मा यांना सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. आदिवासी गाण्यासह पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी ती पहिली आदिवासी महिला आहे.

आदिवासी गायिका- नंचियाम्मा
आदिवासी गायिका- नंचियाम्मा

By

Published : Jul 23, 2022, 12:16 PM IST

पलक्कड (केरळ): भारताच्या पहिल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्यानंतर लगेचच एक दिवसांनी केरळमधील आदिवासी गायिका- नंचियाम्मा यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गायिका नंचियाम्मा यांना सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.

'अयप्पनम कोशियुम' या चित्रपटातील गाण्यासाठी गायिका नंचियाम्मा यांनी गायन केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने चित्रपटासाठी सादर केलेल्या आदिवासी गाण्यासह पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी ती पहिली आदिवासी महिला आहे.

आदिवासी गायिका- नंचियाम्मा

ईटीव्ही भारतशी बोलताना नंचियाम्मा म्हणाल्या, "मी हा पुरस्कार सच्‍य सरांना (दिग्दर्शक के आर सच्चिदानंदन) समर्पित करते. मी येथे टेकडीवर शेळ्या आणि गायी चरत होते. माझ्याबद्दल किंवा अट्टपडीच्या गाण्यांबद्दल कोणालाही माहिती नव्हते. सच्‍य सरांनी मला बाहेर काढले आणि लोकांना माझ्याबद्दल आणि आमच्या संगीताबद्दल माहिती झाली."

"या भूमीने, जनतेने मला आनंदाने स्वीकारले आणि मला जग पाहण्यास मदत केली. मला जग दाखवून सच्ची सर जग सोडून गेले. सच्ची सरांसाठी हा पुरस्कार मी आनंदाने स्वीकारणार आहे. माझ्या हाती दुसरे काही नाही," असे म्हणत तिने हात जोडले.

हेही वाचा -'हवाई चप्पल' घालणाऱ्यांना 'हवाई प्रवास' घडवणाऱ्या माणसाची चित्तरकथा “सोरराई पोत्रू”

ABOUT THE AUTHOR

...view details