हैदराबाद - माजी बॉलीवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पती महेश बाबूसह मुले सितारा आणि गौतम यांच्याशी संवाद साधतानाचा फोटो पोस्ट केला आहे. नम्रताने या फोटोला 'माझे 3 मस्केटियर्स परत एकत्र' असे कॅप्शन दिले आहे. महेश बाबूने पांढर्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. फोटोत तिघे हसताना दिसत आहेत. थ्री मस्केटियर्स हे फ्रेंच भाषेत लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. १८४४ मध्ये लेखक अलेक्झांडर धुमार यांनी लिहिलेली ही एक साहसी कादंबरी होती. यातील मस्केटियर्सचा अर्थ सर्वाधिक प्रिय असा होतो. याच अर्थाने नम्रता शिरोडकरने आपल्या पती आणि मुलांना उद्देशून थ्री मस्केटियर्स म्हटले आहे.
नम्रताच्या भेटीसाठी महेश बाबू मुलांसह पॅरिसमध्ये दाखल- फोटोवरुन असे दिसते की अभिनेत्री नम्रता अद्याप पॅरिसमध्ये आहे, जिथे महेश बाबू आणि गौतम तिच्यासोबत सामील झाले. नम्रता शिरोडकर, तिची मुलगी सितारा घट्टामनेनीसह, युरोपातील सर्वात रोमँटिक शहरांपैकी एक असलेल्या पॅरिसमध्ये खूप छान वेळ घालवत होती. तिने तिच्या चाहत्यांना तिच्या सुट्टीतील फोटोंसह ट्रीट केले, ज्यामध्ये तिची बहीण शिल्पा देखील तिच्यासोबत होती. त्यांच्या नियोजनानुसार त्यांना पॅरिस फिरुन झाल्यानंतर त्यांच्या पसंतीचे सुट्टीचे ठिकाण असलेल्या स्वित्झर्लंडला जायचे आहे. यासाठी महेश बाबू आणि त्यांचा मुलगा गौतम हे सितारासह निघाल्याची बातमी हैदराबाद विमानतळावरुन मिळाली होती.