महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Parineeti chopra : परिणीती चोप्रानं काढला पापाराझीवर राग ; व्हिडिओ व्हायरल... - परिणीती चोप्रा आणि पापाराझी

Parineeti chopra : परिणीती चोप्राचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पापाराझीवर चांगलीच संतापली आहे.

Parineeti chopra
परिणीती चोप्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 6:55 PM IST

मुंबई Parineeti chopra : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळं चर्चेत आहे. परिणीती ही सप्टेंबरमध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढांसोबत लग्न करणार आहे. दरम्यान आता परी ही वेगळ्या कारणामुळं चर्चेत आली आहे. परिणीती चोप्राला मुंबईमध्ये फिरत असताना पापाराझीनं स्पॉट केलं. त्यानंतर ते तिचा पाठलाग करत आले. परिणीती या गोष्टीमुळे खूप नाराज झाली. पापाराझी ज्यावेळी तिचे फोटो क्लिक करत होते, त्यावेळी ती त्यांच्यावर चांगलीच संतापली. नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिनं पापाराझीला म्हटलं, मी तुम्हाला इथे निमंत्रण दिलं नाही. कृपया फोटो काढणं बंद करा, असं बोलून तिनं आपला राग व्यक्त केला.

परिणीती चोप्रा पापाराझीवर संतापली :व्हायरल व्हिडिओमध्ये, परिणीती चोप्रा पापाराझीवर रागावलेली दिसत आहे. ती तिच्या कारमधून बाहेर पडताच तिचे फोटो काढण्यास सुरुवात होते. यावेळी परिणीती चोप्रा निळा आणि लाल क्रॉप स्वेटशर्टसह जीन्समध्ये दिसत आहे. यावर तिनं सनग्लास घातल्या आहेत. याशिवाय तिनं केस हे पोनीटेलमध्ये बांधले आहेत. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. परिणीतीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर बोलत आहेत. काहीजणांनी सेलिब्रिटींच्या गोपनीयतेवर आक्रमण केल्याबद्दल पापाराझींची निंदा करत आहे.

चाहत्यांनी केल्या कमेंट :एका यूजरने लिहिले की, 'त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा.' दुसर्‍या यूजरनं लिहिलं की, शेवटी मनुष्य आहे राग येणारच ना'. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, 'त्यांचे स्वतःचे खासगी आयुष्य आहे, मूर्ख लोक आहेत.' परिणीती चोप्रा ही अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट टिनू सुरेश देसाईने दिग्दर्शित केला आहे. 'मिशन रानीगंज' चित्रपट पश्चिम बंगालमधील राणीगंज कोलफिल्ड 1989 मध्ये कोसळलेल्या खऱ्या घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. खास बाब म्हणजे परिणीती उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये लवकरच लग्न करणार आहेत.

हेही वाचा :

  1. King Khans disclosure : शाहरुख खान चार वर्षे होता नर्व्हस, मुलांच्या आग्रहामुळे केले पुनरागमन : किंग खानचा खुलासा
  2. Anurag Kashyap on Kangana : अनुराग कश्यप म्हणतो कंगना रणौत 'उत्कृष्ट अभिनेत्री' असली तरी तिला सामोरं जाणं 'खूप अवघडंय'
  3. Poonam pandey: पूनम पांडेच्या घराला लागली आग ; मोलकरणीनं वाचविलं पाळीव कुत्र्याचे प्राण...

ABOUT THE AUTHOR

...view details