महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Naal 2 Bhingori song out : 'नाळ 2'मधील मनाचा ठाव घेणारं ‘भिंगोरी’ गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ... - नागराज मंजुळे

Naal 2 Bhingori song out : नागराज मंजुळेची महत्त्वाची भूमिका असलेला 'नाळ 2' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये ‘चैत्या’ मोठा झाला असून त्याच्यावर चित्रीत झालेलं ‘भिंगोरी’ हे गाणं प्रदर्शित झालंय.

Naal 2 Bhingori song out
नाळ 2 भिंगोरी गाणं रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 2:15 PM IST

मुंबई - Naal 2 Bhingori song out :बालकलाकार श्रीनिवास पोकळे सध्या त्यांच्या ‘नाळ 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट नाळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील चैत्यावर चित्रीत झालेलं 'आई मला खेळायला जायचंय, जाऊदे न्हवं', हो गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. आता ‘नाळ भाग 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांनी संगीत दिलं असून वैभव देशमुख यांनी याचे बोल लिहलेत. ‘भिंगोरी’ गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांनी गायलं आहे. ‘नाळ’ची निर्मिती झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी केली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

'नाळ 2'ची रिलीज डेट : 2018 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’मध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. ‘नाळ 2’ मध्ये चैतू हा मोठा झालाय. तो आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आलाय. आहे. दरम्यान, ‘भिंगोरी’ या गाण्यात पश्चिम महाराष्ट्रातील डोंगररांगा सहजपणे डोळ्यात भरतात. निसर्गसौंदर्यानं खुललेल्या या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी हे देखील या गाण्यात दिसतात. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जातो त्याची कहाणी चित्रपटात बघायला मिळणार आहे.

'नाळ'मधील लोकप्रिय गाणं : 'आई मला खेळायला जायचंय, जाऊदे न्हवं' या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यानं चैतूच्या या नव्या प्रवासाची सुरुवात बघायला मिळेल. नात्यांमधले चढ-उतार आणि गुंता असलेला हा प्रवास चैतूला झेपेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं या चित्रपटामधून मिळतील. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणतात, 'गावातील खूप छोट्या छोट्या गोष्टी, या गाण्यात टिपण्यात आल्या आहेत. गाण्याची टीमही अतिशय जबरदस्त होती. ज्याप्रमाणे ‘नाळ’च्या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रेम केलं, तसंच प्रेम ‘नाळ भाग 2’मधील गाण्यांवरही करतील. अशी त्यांना खात्री आहे.

हेही वाचा :

  1. Allu Arjun Receives Grand Welcome : अल्लु अर्जुनचं हैदराबादमध्ये जंगी स्वागत, ढोल ताशांसह फटाक्यांची आतषबाजी
  2. Leo Advance Booking : थलपथी विजयच्या 'लिओ'नं वाजला डंका; जागतिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग 200 कोटीच्या जवळपास
  3. Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details