महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नागार्जुनने रणबीर, आलियाला दिल्या सुंदर मुलासाठी शुभेच्छा - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत पहिल्यांदाच नागार्जुना ब्रम्हास्त्र चित्रपटात स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. सध्या आलिया प्रेग्नंट असून तिला सुंदर बाळ होण्यासाठी नागार्जुनाने शुभेच्छा दिल्या आहेत.

Etv Bharat
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

By

Published : Sep 3, 2022, 10:08 AM IST

हैदराबाद - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आई वडील होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव होत असतो. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुना यांनी या जोडप्याला सुंदर संदेश देऊन प्रेमाचा आशीर्वाद दिला आहे. शुक्रवारी हैदराबादमध्ये 'ब्रह्मास्त्र'च्या पत्रकार परिषदेदरम्यान, नागार्जुनने रणबीर आणि आलियासाठी 'सुंदर मुला'साठी शुभेच्छा दिल्या.

"या दोघांना मी काय सांगू? मी त्यांना त्यांच्या लहानपणापासून पाहिले आहे. ते या चित्रपटात माझे सहकारी आहेत. आम्ही वयाच्या सीमा ओलांडल्या आणि मित्र बनलो. त्यांना जाणून घेणे खूप छान वाटले," असे नागार्जुन म्हणाला. यावेळी त्याने 'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया आणि रणबीरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करत असल्याचे सांगितले.

तो पुढे म्हणाला, "ते सध्या या देशातील सर्वात जबरदस्त प्रतिभावंतापैकी एक आहेत, हे अविश्वसनीय आहे की ते दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले आहेत. सर्व तेलुगू लोकांकडून, या मंचावरील सर्व लोकांकडून, माझ्या ओळखीच्या प्रत्येकाकडून, आम्ही शुभेच्छा देतो. तुम्हाला एक सुंदर मूल होवो आणि ते तुमच्या दोघांपेक्षाही महान होवो."

रणबीर आणि आलियाला जेव्हा नागार्जुनने ही गोड इच्छा बोलून दाखवली तेव्हा ते दोघेही लाल झालेले दिसले. आलिया आणि रणबीरने यावर्षी 14 एप्रिल रोजी लग्न केले आणि 27 जून आलियाने जाहीर केले की ती प्रेग्नंट आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असलेला त्यांचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट 9 सप्टेंबर रोजी हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे.

हेही वाचा -Virat Kohli Restaurant विराट कोहली सुरु करणार किशोर कुमारांच्या मुंबईतील बंगल्यात रेस्टॉरंट

ABOUT THE AUTHOR

...view details