मुंबई - HBD Mouni Roy : 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये जन्मलेल्या मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती आज 38वा वाढदिवस साजरा करत आहे. तिनं टीव्हीच्या दुनियेतून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि मोठ्या पडद्यावरही आपली प्रतिभा दाखवली. मौनीला तिच्या सुंदर आणि बोल्ड लूकमुळं चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाते. अनेकदा ती आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या पोस्टवर अनेक चाहते भरभरून कमेंट करत असतात. दरम्यान, आता या खास प्रसंगी मौनी रॉयची खास मैत्रीण दिशा पटानीनं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिशानं 28 सप्टेंबरला सकाळी सोशल मीडियावर मौनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक प्रेमळ पोस्ट केली आहे. दिशाच्या पोस्टमध्ये मौनी आणि दिशा यांच्यातील मैत्री खूप खोल असल्याचं दिसत आहे.
मौनी रॉय आणि दिशा पटानी फ्रेंडशिप :मौनी रॉय आणि दिशा पटानी एक वर्षापूर्वीच 'बेस्टी' बनल्या आहेत. अक्षय कुमार डान्सिंग टूरवर एकत्र गेल्यानंतर मौनी आणि दिशा यांच्यात मैत्री झाली. या टूरवर असताना त्यांनी अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मौनी आणि दिशा अनेकदा एकत्र दिसतात. दोघेही त्यांच्या फ्रेंड सर्कलसोबत खूप एन्जॉय करताना दिसतात. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ या...
मौनीनं कशी केली करिअरची सुरुवात : मौनी रॉयनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या वडिलांची इच्छा होती की तिनं आयएएस अधिकारी व्हावं, पण तिची मात्र लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. ती दिल्लीत आल्यावर पत्रकार बनण्याच्या प्रयत्नात होती. त्यासाठी तिनं जामिया मिलिया इस्लामियामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेशही घेतला. मौनीनं अर्धवट शिक्षण सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. तिला एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेत तिनं कृष्ण तुलसीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. तिला 'नागिन' मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय ती 'महादेव', 'कस्तुरी', 'दो सहेलिया' आणि 'जुनून- ऐसी नात तो इश्क कैसा' या मालिकांमध्येही दिसली होती.
मोठ्या पडद्यावर केलं पदार्पण : मौनी रॉयनं मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तिनं अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिनं 'रोमियो अकबर वॉल्टर', 'मेड इन चायना' अशा चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलीकडेच ती आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसली होती. मौनी रॉयनं 2022 मध्ये बिझनेसमन सूरज नांबियारशी लग्न केलं.
हेही वाचा :
- Buy One Get One Free Ticket for Jawan: ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'च्या निर्मात्यांनी दिली तिकिटांवर ऑफर...
- Lata Mangeshkar Birth Anniversary: लता मंगेशकर या सात शब्दातच सामवली होती संगीताची जादू
- Prabhas wax statue removed : बाहुबली फेम प्रभासचा पुतळा हटवणार, म्हैसूर संग्रहालयाने का घेतला निर्णय?