मुंबई -पॉवर हाऊस परफॉर्मर रणवीर सिंग याचा 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा जोरदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीर अत्यंत वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. एक जोरदार सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट भरपूर मनोरंजक आहे हे ट्रेलरवरुन स्पष्ट दिसत आहे.
जयेशभाईचे वडील गावचे सरपंच आहे. त्यांच्यानंतर जयेश सरपंच होणार आहे. मात्र त्याच्यानंतर सरपंच जयेशचा मुलगाच होईल अशी अटकळ आहे. पण जयेशला मुलगी होते आणि त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होते. मुलगीही कमी नसतात, मुलगा किंवा मुलगी याचा जन्म आईच्या हाती नसतो तर तो वडीलाच्या हाती असतो असा महत्त्वाचा संदेश या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.