मुंबई- आपल्या फिगर आणि वर्कआउट सेशनने सोशल मीडियावर चर्चेत असलेली मलायका अरोरा अडचणीत आली आहे का? खरंतर मलायका अरोराच्या घरी पोलिस दिसले आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मलायका अरोरा बसली आहे आणि पोलिस तिच्याभोवती उभे आहेत. आता मलायका अरोराच्या घरी पोलीस का पोहोचले असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
मलायकाला पोलिसांनी घेरलं? - व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मलायका अरोराच्या घरी काही पोलिस दिसत आहेत. मलायका सोफ्यावर बसलेली असून तिच्यासमोर काही पोलिस उभे असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना असे वाटते की अभिनेत्री कोणत्यातरी अडचणीत सापडली आहे. पण मलायकाच्या चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
मलायकाला मिळाले पोलिसांचे निमंत्रण- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस मलायका अरोराच्या घरी कोणत्याही चौकशीसाठी नाही तर तिला आमंत्रित करण्यासाठी पोहोचले होते. मुंबई पोलीस एक कार्यक्रम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोलीस इव्हेन्टमध्ये मलायका परफॉर्मन्स करणार असल्याची चर्चा आहे.
सुट्टीनंतर परतली मलायका - नुकतीच मलायका तुर्कीहून वीकेंड सेलिब्रेट करून परतली आहे. येथून मलायकाने सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉलिडे लूक दिसत होता, त्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स तिचे फोटो बघून म्हणत होते, तू हनिमूनला आहेस का? तर काही युजर्सनी तिला अर्जुन कपूर कुठे आहे असे विचारले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत.
हेही वाचा -जॉनी डेप विरुद्ध खटला हरल्यानंतर अंबरला सौदी व्यक्तीने घातली लग्नाची मागणी