महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला २९ मे पासून होणार सुरुवात; ३०० हून अधिक चित्रपट दाखवणार! - MIFF Festival from 29th May

१७ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९ मे ते ४ जून, २०२२ या कालावधीत मुंबई येथील, नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये होणार आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ३० देशांमधून ८०८ प्रवेशिका आल्या आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात ३०० हून अधिक चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

मिफ्फ फेस्टीव्हल २९ मे पासून
मिफ्फ फेस्टीव्हल २९ मे पासून

By

Published : May 14, 2022, 3:02 PM IST

मुंबई - भारतातील आणि परदेशातील चित्रपट निर्माते आणि चित्रपटसृष्टी ज्याची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत असतात असा माहितीपट, लघुपट आणि एनिमेशन चित्रपटांसाठीचा १७ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९ मे ते ४ जून, २०२२ या कालावधीत मुंबई येथील, नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये होणार आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ३० देशांमधून ८०८ प्रवेशिका आल्या आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात ३०० हून अधिक चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

विविध श्रेणींमध्ये विजेत्यांना पुरस्कार - फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांनी सांगितले की, १७ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला सुवर्णशंख आणि १० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. विविध श्रेणींमध्ये विजेत्या चित्रपटांना रोख रक्कम, रौप्य शंख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रे दिली जातील. भारत "आझादी का अमृत महोत्सव" साजरा करत असल्यामुळे, यंदाच्या महोत्सवात India@75 या संकल्पनेवर आधारीत सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे. या महोत्सवामध्ये भारतातील नॉन फीचर फिल्म क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा रोख १० लाख, स्मरणचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रतिष्ठित व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाईल.

दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि नॉन फीचर फिल्म असलेल्या चित्रपटांसाठीचा सर्वात मोठा महोत्सव, मिफ्फ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागतर्फे आयोजित केला जात असतो आणि त्यात महाराष्ट्र सरकार सहभागी होते. हा चित्रपट महोत्सव जगभरातील निर्मात्यांसाठी एक पर्वणीच असते. स्पर्धा आणि बिगर-स्पर्धा विभागांव्यतिरिक्त, कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन, खुला मंच आणि बीटूबी (B2B) सत्रांसारखी परस्परसंवादी सत्रे ही महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. इतर नागरिकांसाठी ३०० रुपये असणार आहे.

विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपटही दिसणार - ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नेटफ्लिक्समधील"माय लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल यासारखे लघुपटही दाखवले जातील. याशिवाय बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्षांच्या स्मरणार्थ हसिना-अ डॉटर्स टेल या समीक्षकांनी गाजलेल्या चित्रपटासह 11 चित्रपटांचे विशेष भाग दाखविण्यात येणार आहे. एनआयडी, एसआरएफटीआय, एमआयटी पुणे, के आर नारायणन फिल्म इन्स्टिट्यूट केरळ सारख्या नामांकित संस्थांकडून विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपटही या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरेल. याशिवाय अनेक कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचा- लुई व्हिटॉन हाऊस अॅम्बेसेडर म्हणून दीपिका पदुकोणने पहिल्यांदा लावली हजेरी पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details