मुंबई :सुनावणीनंतर न्यायालयाने निर्देश दिले की, प्रलंबित बिल नवाजुद्दीन सिद्दिकीने पत्नीला देऊन टाकावे. मात्र, पत्नीच्यावतीने याचीकेमध्ये मांडलेला लॉन्ड्रीचे बिलदेखील बाकी आहे. या मुद्द्यावर न्यायालयाने त्यांना फटकारले की, तुम्ही न्यायालयाचा वेळ लॉन्ड्रीच्या बिलांसाठी घेऊ नका. न्यायालयाच्या समोर अनेक मोठे खटले आहेत याचा विचार करा.
100 कोटी रुपयांचा दावा : बॉलीवूड स्टार नवाजउद्दीन सिद्दिकी आणि त्याची पहिली पत्नी झैनब यांच्यामध्ये कुटुंब कलह झाला होता. हा कुटुंब कलह झाल्यानंतर समाज माध्यमांत पत्नी झैनब आणि नवाजचा भाऊ समसूद्दीन यांनी अनेक बदनामीकारक माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे याबाबत मुंबई उच्च न्यायालयासमोर नवाजुद्दीन सिद्दिकी याच्यामार्फत 100 कोटी रुपयांचा दावा पत्नी झैनब आणि लहान भाऊ समसूद्दीन यांच्यावर ठोकला होता.
समझोत्याच्या अटी आणि शर्ती निश्चित : इतक्या मोठ्या रकमेचा दावा ठोकल्यानंतर भाऊ समसूद्दीन आणि पहिली पत्नी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठांसमोर मागील सुनावणी वेळी समझोता नक्की करण्यात आला. समझोत्याच्या अटी आणि शर्ती देखील निश्चित केल्या गेल्या. त्यानुसार दोन्ही पक्षकारांना त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.