मुंबई: राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचा जन्म होऊन ११ दिवस झाले आहेत आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीतून तिच्यासाठी शुभेच्छा आणि भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी राम आणि उपासना यांना मुलगी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आता एक बातमी समोर येत आहे की, उद्योगपती मुकेश अंबानीने राम चरणच्या मुलीला सोन्याचा पाळणा भेट दिला आहे, ज्याची किंमत एक कोटी रुपये आहे.
सोन्याचा पाळणा : मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांनी राम चरण यांच्या मुलीला सोन्याचा मौल्यवान पाळणा भेट दिला आहे, ज्याची किंमत १ कोटी आहे. पण प्रत्यक्षात असे काहीच नाही. मुकेश अंबानी यांनी राम चरण आणि उपासना यांच्या मुलीला सोन्याचा पाळणा भेट दिल्याच्या बातम्या खऱ्या नाहीत. राम चरण आणि त्याच्या कुटुंबाकडूनही अशा गोष्टीची पुष्टी झालेली नाही.
नामकरण सोहळा :दरम्यान,आता नुकतेच राम चरणच्या मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब सामील होते. परंपरेनुसार रामाची पत्नी उपासना हिच्या आईच्या घरी नामकरण सोहळा झाला. उपासनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नामकरण सोहळ्याचे काही फोटो आणि एक क्लिप शेअर केली आहे. संपूर्ण कुटुंब या सोहळ्यात सहभागी झाले आहे, उपासनाने राम चरण आणि त्याचे वडील चिरंजीवी तसेच इतर कुटुंबातील सदस्यांचे फोटो शेअर केले करून आपल्या मुलीचे नावही चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने आपल्या मुलीचे नाव एक क्लिन कारा कोनिडेला ठेवले आहे.
काय नाव ठेवले : फोटोसह, उपासनाने कॅप्शन लिहिले, 'क्लिन कारा कोनिडेला, ललिता सहस्रनामातून घेतलेले , एक परिवर्तनकारी, शुद्ध उर्जेचे प्रतीक आहे. जे आध्यात्मिक जागृती आणते'. २० जून रोजी राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या मुलीचे स्वागत केले होते. उपासना आणि रामच्या मुलीला पाहण्यासाठी अनेक चाहते हॉस्पिटलमध्ये आले होते. रामच्या चाहत्याने तोड गोड करून रामच्या मुलीचे स्वागत केले. त्यानंतर या जोडप्याला अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे देखील शुभेच्छा दिल्या होत्या.
हेही वाचा :
- Parineeti and Raghav potted : परिणीती आणि राघव चढ्ढा अमृतसर विमानतळावर दाखल, जोडपे श्री हरमंदिर साहिबला देणार भेट
- 11 Bollywood Couples : वयातील धक्कादायक अंतर असलेली ११ बॉलीवूड जोडपी
- BOX OFFICE COLLECTION DAY 2 : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईचा वेग बॉक्स ऑफिसवर मंदावला