महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जानेवारी 2024 मध्ये 'हे' चित्रपट आणि वेब सीरीज होणार रिलीज - हे चित्रपट होणार रिलीज

Movies and Web Series in January 2024 : जानेवारी महिना मनोरंजन विश्वासाठी विशेष असणार आहे. या महिन्यात अनेक वेब सीरीज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

Movies and Web Series in January 2024
जानेवारी 2024 मधील चित्रपट आणि वेब सीरीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 5:42 PM IST

मुंबई - Movies and Web Series in January 2024 :नवीन वर्ष 2024 सुरू झालं आहे. 2024 हे वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीने उत्तम आहे. यावर्षी अनेक चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज होणार आहेत. दरम्यान 2024 चा पहिला महिना हा खूप विशेष असणार आहे. या महिन्यात कोणत्या वेब सीरीज आणि चित्रपट रिलीज होणार, हे आपण जाणून घेऊया.

जानेवारीमध्ये हे चित्रपट आणि वेब सीरीज होणार रिलीज :

किलर सूप:मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन स्टारर थ्रिलर वेब-सीरीज 'किलर सूप'चा ट्रेलर आज 3 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. ही वेब सीरीज 11 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

द लीजेंड ऑफ हनुमान एस 3 : डिस्ने प्लस हॉट स्टारवर 'द लीजेंड ऑफ हनुमान एस 3' हा चित्रपट 12 जानेवारी प्रदर्शित होईल. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे.

इंडियन पुलिस फोर्स : रोहित शेट्टी दिग्दर्शित पहिली वेब-सीरीज 'इंडियन पोलिस फोर्स' 19 जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

कर्मा कॉलिंग :रवीना टंडन स्टारर वेब-सीरीज 'कर्मा कॉलिंग' 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजचं दिग्दर्शन रुची नारायण यांनी केलं आहे. 'कर्मा कॉलिंग'मध्ये रवीना इंद्राणी कोठारी या श्रीमंत व्यक्तिरेखेत भूमिका साकारताना दिसणार आहे.

अ‍ॅनिमल आणि सॅम बहादूर : डिसेंबर 2023 च्या शेवटच्या महिन्यात खळबळ उडवून देणारे 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतात. या चित्रपटांनी बाॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे.

जानेवारीमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट

'तौबा तेरा जलवा' : अमिषा पटेल, जतिन खुराना आणि अँजेला क्रिसलिंस्की स्टारर 'तौबा तेरा जलवा' हा चित्रपट 5 जानेवारीला म्हणजेच या शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. आकाशदित्य लामा दिग्दर्शित हा चित्रपट रोमँटिक आणि थ्रिलर आहे.

मेरी ख्रिसमस : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत चित्रपट 'मेरी ख्रिसमस' गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही आणि आता तो पोंगलच्या मुहूर्तावर 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होईल.

रुसलान :सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि साऊथ चित्रपटांमध्ये खलनायक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता जगपती बाबू यांची मुख्य भूमिका असलेला 'रुसलान' हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटचा दिग्दर्शन कात्यायन शिवपुरी यांनी केलं आहे.

कल्कि 2898 एडी :प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी स्टारर चित्रपट 'कल्की 2898 एडी' 12 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे.

गुंटूर करम : साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि श्रीलीला स्टारर चित्रपट 'गुंटूर करम' चित्रपट 12 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलं आहे.

लाल सलाम :साऊथ अभिनेता रजनीकांत यांनी 'जेलर' जबरदस्त कामगिरी केली आहे. दरम्यान त्याचा 'लाल सलाम' हा चित्रपट 2 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

मैं अटल हूं : पंकज त्रिपाठी स्टारर पॉलिटिकल ड्रामा 'मैं अटल हूं' चित्रपट 19 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे.

फायटर :हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर स्टारर चित्रपट 'फायटर' 25 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. कोर्ट मॅरेजनंतर आयरा खान आणि नुपूर शिखरे होणार राजस्थानला रवाना
  2. बॉबी देओलनं मुलगा आर्यमन देओलसोबतचे शेअर केले फोटो
  3. आयरा खान-नुपूर शिखरेचा आज महाराष्ट्रीयन पद्धतीन होणार विवाह, नुपूर रोमँटिक पोस्ट केली शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details