महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मौनी रॉयन शेअर केले बेडरुममधील फोटो, चाहत्यांमध्ये खळबळ - mouni roy video

मौनी रॉयने बेडरूममधील तिचा नवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या मनात खळबळ निर्माण केली आहे. तुम्ही हे फोटो पाहिले आहेत का?

मौनी रॉयन शेअर केले बेडरुममधील फोटो
मौनी रॉयन शेअर केले बेडरुममधील फोटो

By

Published : Jul 14, 2022, 1:32 PM IST

मुंबई - टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड स्टाईल आणि कर्वी फिगरसाठी प्रसिद्ध आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. कधीकधी मौनी रॉयचे पती सूरज नांबियारसोबत फिरतानाचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या बोल्ड आणि देसी फोटोशूटमुळे चर्चेत राहतात. आता मौनी रॉयने तिच्या बेडरूममधील श्वास रोखणारे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत आणि मौनीने या पोस्टसह एक चिठ्ठीदेखील शेअर केली आहे.

सर्वप्रथम मौनी रॉयच्या इंस्टाग्राम पोस्टमधील फोटोबद्दल बोलू, जो अभिनेत्रीच्या बेडरूममधील आहे. मौनीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये मौनी रॉय बेडवर पडली असून तिने ब्लॅक हॅंगिंग ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये तिची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.

या फोटोवर मौनी रॉयचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मौनी रॉयच्या बहुतेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोवर फायर इमोजी शेअर केले आहेत. तर काही चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करून अभिनेत्रीवरचे प्रेम व्यक्त केले आहे.

मौनी रॉयच्या या फोटोला आता ९० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अशाच प्रकारे मौनी रॉय तिच्या चाहत्यांना आपल्या हृदयात ठेवते आणि सतत त्यांना तिचे फोटोशूट पाठवत असते.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे, जो या वर्षी 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटातील मौनी रॉयचे पात्र नकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -इंदिरा गांधीच्या करारी भूमिकेतील कंगना रणौतचा फर्स्ट लूक टीझर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details