महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pre Birthday Celebration : बॉलिवूडची हॉट गर्ल दिशा पटानी 13 जूनला 31वा वाढदिवस साजरा करणार

अभिनेत्री दिशा पटानी 13 जूनला तिचा 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवस येण्यापूर्वीच दिशाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. काल रात्री दिशा पटानीने तिचा वाढदिवस बेस्ट फ्रेंड मौनी रॉयसोबत साजरा केला आहे.

Disha Patani
दिशा पटानी

By

Published : Jun 12, 2023, 5:34 PM IST

मुंबई : बॉलिवूडची हॉट गर्ल दिशा पटानी 13 जूनला तिचा 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधीही दिशाच्या फ्रेंड सर्कलमध्ये तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. काल रात्री दिशा पटानीने तिचा वाढदिवस बेस्ट फ्रेंड मौनी रॉयसोबत साजरा केला. यावेळी दिशा आणि मौनी गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसल्या. मौनी रॉयने दिशा पटानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिला किस केले. वाढदिवस साजरा करतानाचे दिशा आणि मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिशा पटानीने 2016 मध्ये एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने महेंद्र धोनीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकरली होती. या चित्रपटात दिशा ही फार कमी दिसली आहे मात्र तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मने जिंकली होती. तसेच या चित्रपटात महेंद्र सिंग धोनीच्या भूमिकेत हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता. याशिवाय या चित्रपटात कियारा आडवाणीने महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी सिंग रावतची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चालला होता.

मौनी आणि दिशाचे प्रेम : दिशा पटानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत पोहोचली होती. या पार्टीत दिशा आणि मौनीच्या अनेक मैत्रिणीही हजर होत्या. दिशा आणि मौनीने मॅचिंग शॉर्ट गुलाबी रंगाचे कपडे घातले होते, ज्यामध्ये त्या दोघी सेक्सी बाहुल्यांसारख्या दिसत होत्या. मौनी रॉयने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट फ्रेंड दिशाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

दिशा पटानीचा वाढदिवस :मौनी रॉय आणि दिशा पटानी या पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत डान्स टूरवर गेल्या होत्या, तेव्हापासून दोघेही बेस्ट फ्रेंड बनल्या आहेत. त्याचबरोबर या डान्स टूरमध्ये दिशा आणि मौनीने मालदीवच्या बीचवर खूप एन्जॉय केला होता. मौनी रॉय आणि दिशा पटानी या दोघीही ब्युटी गर्ल या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. या दोघीही हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना आकर्षित करत असतात. दोघींच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर , मौनी रॉय शेवटी ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसली होती, तर दिशा एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा :

  1. ICC World Test Championship Final 2023 : विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल
  2. ZHZB Box Office Day 10 : विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
  3. Gadar 2 teaser : गदर 2 च्या टीझरमुळे चाहत्यांची सनी देओल उर्फ तारा सिंगबद्दलची उत्सुकता वाढली

ABOUT THE AUTHOR

...view details