महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

एस एस राजामौलीचे शिष्य अश्विन गंगाराजू दिग्दर्शित १७७० या चित्रपटाचे मोशन पोस्टर झाले लाँच - Bankimchandra Chatterjee

बंकिमचंद्र चटर्जी यांच्या गाजलेल्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित १७७० हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या भव्यदिव्य चित्रपटाचे दिग्दर्शन करताहेत एस एस राजामौलीचे शिष्य अश्विन गंगाराजू. आता या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.

१७७० या चित्रपटाचे मोशन पोस्टर
१७७० या चित्रपटाचे मोशन पोस्टर

By

Published : Aug 18, 2022, 11:22 AM IST

Updated : Aug 18, 2022, 11:46 AM IST

मुंबई- राम कमल मुखर्जी यांची निर्मिती असलेल्या ‘१७७०’ या भव्यदिव्य चित्रपटाचे दिग्दर्शन करताहेत एस एस राजामौलीचे शिष्य अश्विन गंगाराजू. त्यांनी याआधी राजामौली यांना 'एग्गा ' आणि 'बाहुबली ' या दोन्ही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. हा चित्रपट ‘बंकिमचंद्र’ यांच्या 'आनंदमठ ' या साहित्यकृतीवर आधारित असून त्याचे नुकतेच मोशन पोस्टर लाँच करण्यात आले. खास बात म्हणजे "१७७०" हा चित्रपट तब्बल सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

निर्माते शैलेंद्र के कुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित बहुचर्चित भव्यदिव्य अशा ‘१७७० ‘चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच केले. एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एस एस १ एन्टरटेनमेन्ट आणि पी के एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून या बहुभाषिक असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू हे करणार आहेत.

अश्विन गंगाराजू म्हणाले, "हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता पण दिग्गज व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरित कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चित वाटते आहे की आमच्याकडे ज्या पद्धतीने हे लेखन झाले आहे तो एक ब्लॉकबस्टर सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ज्या कथांमध्ये विशिष्ट कालखंड दाखवणारी पार्श्वभूमी असेल ,भावनांना जिथे जास्त महत्व असेल आणि जिथे 'लार्जर दॅन लाईफ कृतीला वाव असेल अश्या कथांकडे एक निर्माता म्हणून मी जास्त आकर्षित होतो.”

“या गोष्टीबद्दल सुरुवातीला मी थोडा साशंक होतो पण जेव्हा मी राम कमल मुखर्जी यांच्याशी बोललो आणि त्यांचा या बद्दलचा दृष्टिकोन जाणून घेतला तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर काही वेळातच मी निर्माते शैलेंद्र जी, सुजय कुट्टी सर, कृष्ण कुमार सर आणि सूरज शर्मा यांना मुंबईत भेटलो. आमची चित्रपटाबद्दल आणि त्यांना तो चित्रपट कशा पद्धतीने पुढे न्यायचा आहे याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. एकत्र काम करण्याची त्यांची वृत्ती, त्यांच्या मनातील जिव्हाळा या गोष्टींमुळे मी त्यांच्याशी लगेचच जोडला गेलो," असे अश्विन पुढे म्हणाले. सांगत होते.

यावर्षी "वंदे मातरम"ची १५० वर्षे पूर्ण होत आहेत, हे गीत महर्षी बंकिमचंद्र यांच्या "आनंदमठ" कादंबरीत प्रथम आले होते आणि या गीताने ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना हादरवून टाकले होते पटकथा लिहिणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध कथाकार व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, “‘वन्दे मातरम्’ हा एक जादुई शब्द होता असे मला वाटते. महर्षी बंकिमचंद्र यांनी राष्ट्राला जुलूम आणि अन्यायाविरुद्द लढण्याकरिता दिलेला हा एक मंत्र होता. स्वातंत्र्य चळवळीची आग पेटवणाऱ्या अनेक अज्ञात योद्धयांची कहाणी आम्ही "१७७०" मध्ये हाताळत आहोत.”

दिवाळीपर्यंत या चित्रपटातील कलाकारांची घोषणा होणार असून अश्विनने त्याच्या टीमसह या कालखंडावर संशोधन सुरू केले आहे आणि ते एक अद्वितीय असा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हेही वाचा -राघव जुयालसोबत डेटिंगच्या बातम्यांवर शहनाज गिलने सोडले मौन

Last Updated : Aug 18, 2022, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details