महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sushmita Sen Aarya 3 : सुष्मिता सेन 'आर्या 3'च्या सेटवर परतली, हृदयविकाराच्या झटक्यानंतर थांबले होते शुटिंग - सुष्मिता सेन पुन्हा आर्याच्या सेटवर परतली

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काही महिन्यांनी, सुष्मिता सेनने राजस्थानमधील जयपूर येथे तिच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सिरीज आर्या सीझन 3 चे शूटिंग पुन्हा सुरू केले. ती पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये आल्याची घोषणा तिने सोशल मीडियावरुन केली आहे.

सुष्मिता सेन 'आर्या 3'च्या सेटवर
सुष्मिता सेन 'आर्या 3'च्या सेटवर

By

Published : Apr 25, 2023, 4:12 PM IST

मुंबई- बॉलिवूड स्टार सुष्मिता सेनने मंगळवारी सांगितले की, तिला हृदयविकाराचा झटका आल्याच्या जवळपास दोन महिन्यांनंतर तिने जयपूरमध्ये तिच्या प्रशंसित वेब सिरीज आर्याच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. मार्चच्या सुरुवातीला एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, सुष्मिताने आपल्याला हृदयविकाराचा झटका आला होता व तिच्यावर रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती.

सुष्मिता सेन पुन्हा आर्याच्या सेटवर परतली- सुष्मिताने इंस्टाग्रामवर आर्या 3 ची एक नवीन झलक शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना शूटिंग पुन्हा सुरू झाल्याबद्दल सूचित केले. व्हिडिओ शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, ती निडर आहे. ती बेधडक आहे. ती परत आली आहे. आर्या सीझन ३ पुन्हा शूट करत आहे. व लवकरच डिस्ने हॉट स्टारवर भेटू, असे लिहिलंय.

सुष्मिताच्या चाहत्यांना आनंद- तिने व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी सुष्मिताच्या कमेंट सेक्शनमध्ये उत्साहात गर्दी केली कारण त्यांची आवडता स्टार अनेक महिन्यांच्या तब्येतीच्या अडचणीनंतर पुन्हा काम सुरू करतेय. आर्यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सेनने सांगितले की, शोचा तिसरा अध्याय तिची व्यक्तिरेखा एका नवीन अॅक्शन-पॅक अवतारात सादर करेल कारण ती एक निर्भय आई, मुलगी आणि स्त्री म्हणून नियंत्रण ठेवते. 'आर्या सामर्थ्य दर्शवते आणि तिचा निःसंकोच आत्मा आता माझ्यासाठी एक अपरिहार्य भाग आहे. आर्यासोबत, मी संपूर्ण नवीन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि तिच्या पात्रात आणखी नेव्हिगेट करण्यासाठी तिच्या निर्भय आभाला तिने चॅनेल केले आहे.'

पेनोझा या डच मालिकेचे अधिकृत हिंदी रूपांतरीत असलेला हा शो, आर्या या महिलेच्या प्रवासाचा पाठपुरावा करतो, जी तिचा नवरा तेज सरीन (चद्रचूड सिंग) याच्या हत्येनंतर गुन्हेगारीच्या जगात सापडते. डिस्ने प्लस हॉटस्टारने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर शेअर केलेल्या आर्याच्या नवीन टीझरमध्ये सुष्मिता सेन तलवारबाजीचा सराव करताना दिसत आहे. बहुप्रतिक्षित सीझन राम माधवानी फिल्म्स आणि एंडेमोल शाइन इंडिया सह-निर्मित आहे.

हेही वाचा -Ileana D Cruz Pregnancy : पहिल्या बाळाच्या स्वागताला इलियाना डिक्रूझ सज्ज, बाळाच्या वडिलाचे नाव मात्र गुलदस्त्यात

ABOUT THE AUTHOR

...view details