महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

With gratitude to Ramoji Rao garu : RRR ला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर एमएम किरावाणी यांनी रामोजी रावांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता - Ramoji Rao

गोल्डन ग्लोब विजेते भारतीय संगीतकार एमएम किरावाणी यांनी रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष रामोजी राव यांचे आभार मानले. किरवाणी RRR चित्रपटासाठी साठी चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यामुळे सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त केली आहे.

रामोजी रावांबद्दल एमएम किरावाणींची कृतज्ञता
रामोजी रावांबद्दल एमएम किरावाणींची कृतज्ञता

By

Published : Jan 16, 2023, 12:54 PM IST

Updated : Jan 16, 2023, 1:17 PM IST

वॉशिंग्टन- आरआरआर चित्रपटाचे संगीतकार, एमएम किरावाणी यांनी सोमवारी रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष रामोजी राव यांच्याबद्दल सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त केली आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाला क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली. नाटू नातटू या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कतार मिळाला. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या समारंभात सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही मिळाला. किरवाणीच्या नाटू नाटू या गाण्याला नुकताच लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन (LAFCA) मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत कोर पुरस्कार मिळाला. RRR च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने ही अपडेट शेअर केली आहे.

रामोजी राव आणि त्यांच्या इतर गुरूंचे आभार मानण्यासाठी किरवाणी यांनी त्यांची कला समृद्ध करण्यात मदत केली अशा सर्वांचा उल्लेख करत त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक मनःपूर्वक टीप देखील शेअर केली 'गोल्डन ग्लोबसह RRR साठी 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर घरी परतत आहे - रामोजी राव गारु आणि बालचंदर सर, भरथन सर, अर्जुन सर्जा आणि भट्ट साब यासर्व मार्गदर्शकांचे कृतज्ञतापूर्वक आभार, ज्यांनी मला तेलुगू राज्यांच्या सीमा ओलांडून माझे संगीत समृद्ध केले.' असे किरावाणी यांनी ट्विट केले.

एसएस राजामौली दिग्दर्शित मॅग्नम ओपस पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपटातील त्याच्या संगीताची प्रशंसा करणारे दिग्गज हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्यासोबतचचा फोटो एमएम किरवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, "महान जेम्स कॅमेरून यांनी दोनदा आरआरआर पाहिला आहे आणि माझ्या स्कोअरवर प्रतिक्रिया दिली आहे!!! उत्साहाने भरलेला महासागर."

सामान्य पाश्चात्य चित्रपटांपेक्षा RRR मधील संगीत आवाज आणि शरीरात कसे बदलते याबद्दल जेम्स कॅमेरॉन यांनी प्रशंसा केली. हा एक मोठा सन्मान आणि माझ्या कामासाठी मान्यता असल्याचे मी मानतो," असे किरवाणी यांनी पुढे म्हटले आहे.

जेम्स कॅमेरून 'अवतार', 'अवतार: द वे ऑफ वॉटर', 'टायटॅनिक' आणि 'द टर्मिनेटर' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.

किरवाणीच्या नाटू नाटू या गाण्याला नुकताच लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन (LAFCA) मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत कोर पुरस्कार मिळाला.

RRR ही काल्पनिक कथा दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी अनुक्रमे मुख्य भूमिका साकारल्या. या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही भूमिका होत्या.

हेही वाचा -Bamboo Trailor : अभिनय बेर्डे अभिनित 'बांबू'च्या ट्रेलरमध्ये निर्माती तेजस्विनी पंडितचीही झलक!

Last Updated : Jan 16, 2023, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details