मुंबई- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेले आहेत. हा फोटो पाहून मिथुनचे चाहते हैराण आणि अस्वस्थ झाले आहेत. या फोटोमुळे अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. चला जाणून घेऊया या व्हायरल फोटोचे सत्य काय आहे?
हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेल्या मिथुन चक्रवर्तीचा हा फोटो अनेक सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर हा फोटो झपाट्याने पसरला आहे. या व्हायरल फोटोचे सत्य मिथुनचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने सांगितले आहे.
वडील मिथुनचे आरोग्य अपडेट देताना मिमोह म्हणाला, 'वडिलांना किडनी स्टोनची समस्या आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा फोटो रुग्णालयातील आहे, पण आता ते पूर्णपणे बरे आहेत. त्यांना बंगळुरूच्या रुग्णालयात भरती झाले होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.