मुंबई - Box office day 2 : अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' आणि भूमी पेडणेकरचा 'थँक यू फॉर कमिंग' हे चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झाले आहेत. 'मिशन राणीगंज' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट स्पर्धा देत आहे. अक्षय कुमार 'ओएमजी 2' चित्रपटानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर परतला आहे. 'मिशन राणीगंज'मध्ये त्यानं एक धाडसी आणि प्रामाणिक खाण अभियंता जसवंत सिंग गिलची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटामध्ये राणीगंज कोलफिल्ड्स येथे अडकलेल्या 65 खाण कामगारांची सुटका कशी होते हे दाखविण्यात आले आहे. याशिवाय 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट सेक्स कॉमेडी म्हणून ओळखला जातो.
'मिशन राणीगंज' आणि थँक यू फॉर कमिंग'ची कमाई : या चित्रपटानं पहिल्या दिवशी 2.8 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट 4 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 6.80 कोटी होईल. दुसरीकडे, भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाची सुरुवात रुपेरी पडद्यावर चांगली झाली नाही. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 0.8 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट 0.96 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 1.76 कोटी झाले आहे. 'थँक यू फॉर कमिंग' दुसऱ्या दिवशी थोडी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.