मुंबई - Mission Raniganj New Song : अक्षय कुमार स्टारर 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. या दोन दिवसांत चित्रपटाने रुपेरी पडद्यावर 7 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता अक्षय हा या चित्रपटातील 'जीतेंगे' हे गाणे रिलीज करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षयनं इन्स्टाग्रामवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरच्या पार्श्वभूमीत एक गाणं वाजत आहे. मोशन पोस्टर शेअर करत त्यानं लिहिलं की, 'हम साथ चले तो 'जीतेंगे' व्हिडिओ उद्या रिलीज होणार आहे. मिशन राणीगंजसह भारताच्या खऱ्या नायकाची कहाणी आता थिएटरमध्ये पहा'. असं त्यानं लिहलं आहे.
अक्षय कुमार शेअर केली एक पोस्ट : 'केसरी' चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गाण्यानंतर अक्षयनं पुन्हा बी प्राकसोबत गाणं केलं आहे. या चित्रपटातील 'जीतेंगे' गाणं प्रवो मुखर्जी यांनी संगीतबद्ध केले आहे. याशिवाय डॉ. कुमार विश्वास यांनी हे गाणं लिहलं आहे. 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू'मधील अक्षयनं पोस्टर शेअर करताच चाहत्यांनी कमेंट विभागात हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहले, 'अक्षयचे प्रत्येक चित्रपट खूप खास असतात'. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'मिशन रानीगंज' हा चित्रपट खूप खास आहे ही कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे'. आणखी एका चाहत्यानं लिहलं, 'अक्षय नेहमीच काही तरी वेगळं करतो' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.