मुंबई :टॉम क्रूझ स्टारर मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाई केली आहे. ख्रिस्तोफर मॅक्वेरी दिग्दर्शित चित्रपट मिशन इम्पॉसिबल ७ हा १२ जुलै रोजी जगभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मिशन इम्पॉसिबल ७ने बॉक्स ऑफिवर १२.३ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर आपला प्रवास सुरू केला होता. या चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या अखेरीस सुमारे ७३ कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. दरम्यान मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपटाने शनिवारी कमाईत लक्षणीय वाढ केली. शनिवारी या चित्रपटाने १६ कोटी कमाविले. त्यानंतर पहिल्या सोमवारी या चित्रपटाने फार काही खास कमाई बॉक्स ऑफिसवर केली नाही. चित्रपटाच्या कमाईत ७१ %ने घसरण झाली. मिशन इम्पॉसिबल ७ने भारतात ७२.८८ रुपयांचा व्यवसाय केला आहे.
ऑक्युपन्सी रेटिंग : ऑक्युपन्सी रेटचे विश्लेषणानुसार मिशन इम्पॉसिबल ७ने मंगळवारी १८ जुलै रोजी इंग्रजी स्क्रीनिंगसाठी १२.७९ % हिंदी स्क्रिनिंगसाठी १०.२७% एकूण व्याप गाठला. विशेष म्हणचे रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक प्रेक्षक या चित्रपटाला मिळाले, त्यामुळे ऑक्युपन्सी रेट १८.८% झाला. दरम्यान, मिशन इम्पॉसिबल ७ने चीनमध्ये $२५.९ दशलक्षचे प्रशंसनीय बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
मिशन इम्पॉसिबल ७ : मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपट १०० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटीच्या कल्बमध्ये प्रवेश करू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. जगभरात टॉम क्रूझचा चित्रपट धमाल करत आहे. मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ने जगभरात जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटात सायमन पेग, हेली एटवेल, विंग रेम्स, रेबेका फर्ग्युसन आणि व्हेनेसा किर्बी यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
टॉम क्रूझने केले धोकादायक स्टंट :टॉम क्रूझने या चित्रपटात एथन हंट नावाचा गृप्तहेर बनला आहे. या चित्रपटात तो सत्याच्या बाजूने लढाई करताना दिसत आहे. तसेच त्याने चित्रपटात खूप धोकादायक स्टंट केले आहे, त्यामुळे हा चित्रपट खूप मनोरंजक आहे. मिशन इम्पॉसिबल -७ चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. तसेच हा चित्रपट निर्मित करण्यासाठी २९१ दशलक्ष लागले आहे. मिशन इम्पॉसिबल -७ तयार करण्यासाठी ३ वर्ष लागले आहे. येणाऱ्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे बघणे लक्षणिय ठरणार आहे.
हेही वाचा :
- baipan bhari deva box office collection day 19 : 'बाई पण भारी देवा' चित्रपटाची १९ दिवसात ५५.३० कोटींची कमाई
- Ranbir Alia wedding : रणबीर आणि आलियाचे 'लग्न' नकली, कंगना रणौतचे नवे टीकास्त्र
- Mission Impossible 7 box office: सहाव्या दिवशी मिशन इम्पॉसिबल- ७ने भारतीय बॉक्स ऑफिसवर मारली बाजी