मुंबई- मायानगरी मुंबईत आलिशान घराचे स्वप्न सर्वच कालाकार बाळगून असतात. आपल्या चिरतरुणपणामुळे आणि आकर्षक शरीरसौष्ठवामुळे नेहमी चर्चेत असलेल्या मिलींद सोमण याने भव्य 4 बीएचके घराची खरेदी केली आहे.
मिलींद सोमण याने खरेदी केलेला फ्लॅट 1720 चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळाचा असून यात आलिशान अशा चार बेडरुम आहेत. मुंबईतील प्रतिष्ठीत अशा प्रभादेवीमध्ये त्याचा नवा आशियाना बनला आहे. त्याच्या या घरापासून दादर चौपाटी अगदी जवळ असून जैन देरासर, प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरही या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर आहेत. दादर रेल्वे स्थानक चालत फक्त दहा मिनिटावर असल्याने शहरातील व्यापारी केंद्रही इथून सहज गाठता येतात.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सुरज इस्टेट डेव्हलपर्सचे पूर्णवेळ संचालक राहुल थॉमस म्हणाले की, “ओशन स्टार प्रभादेवीच्या मध्यवर्ती भागात वसलेले नंदनवन आहे, आजूबाजूचा भाग अत्यंत नयनरम्य असून इथून समुद्रा फक्त 100 मिटरवर आहे. मिलिंद सोमण यांचे सुरज परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.”
वास्तुविषारद संजय पूरी यांनी रचना केलेल्या ओशन स्टार मध्ये 1153 चौ.फू. आणि 1720 चौ.फू. क्षेत्रफळाचे अनुक्रमे 3 आणि 4 बीचके घरे समाविष्ट आहेत. दोन मजल्यांमधील उंची 12.6 असून अरबी समुद्र आणि बांद्रे वरळी सागरी सेतूचे विहंगम दृष्य या घरातून अनुभवायला मिळते.
हेही वाचा -बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रची परीक्षा, चौथ्या दिवसाखेर २५० कोटीकडे वाटचाल