मुंबई - Mia khalifa : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या भीषणतेला जग तोंड देत आहे, तर आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर हल्ला केला आहे. दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सध्या खूप भीषण लढाई सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या हल्ल्यानंतर अनेक जण टीका करत करताना सोशल मीडियावर दिसत आहेत. काही लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलत आहेत तर, काहीजण इस्रायलच्या बाजूनं बोलत आहे. दरम्यान, आता मिया खलिफा हिनं याप्रकरणी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मिया खलिफानं दिला पॅलेस्टाईनला पाठिंबा :ही पोस्ट शेअर झाल्यानंतर तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मियानं एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहत आहेत. तुम्ही पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात. हे इतिहास या काळच दाखवेल.' मियानं पॅलेस्टाईन आणि इस्रायल संघर्षासंदर्भात अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. याआधीही मियानं या प्रकरणावर आपले मत मांडले होते. दरम्यान आता अनेकजण सोशल मीडियावर तिच्यावर टीका करत आहे. एका यूजरनं पोस्टवर कमेंट करत लिहलं, हे ट्विट करण्यापूर्वी तुम्हाला हमासने केलेला बर्बरपणा दिसला नसेल. तुम्ही कदाचित चुकीच्या बाजूला उभे आहात आणि इतिहास तुम्हाला आरसा दाखवेल'. काही यूजर्सने लिहिले, की मियाला या ट्विटसाठी पैसे मिळाले आहेत. अशा अनेक कमेंट या ट्विटवर आल्या आहेत.