मुंबई - प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे बुधवारी निधन झाले. प्रतिभावान कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर असलेल्या देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले. ते एनडी स्टुडिओचे मालक होते आणि याच परिसरात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मुंबईपासून ९० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केली. पुढील आठवड्यात ९ ऑगस्ट रोजी ते ५८ वर्षांचे झाले असते. वाढदिवसाच्या आधी त्यांनी स्वतःचे जीवन संपवल्याने कलाविश्वाला धक्का बसला आहे.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नितीन देसाई यांनी मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालयातून फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले. 1987 पासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. '1942 अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाने नितीन देसाई हे नाव खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ सारख्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्याबद्दल- गेल्या दोन दशकांहून जास्त काळ कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी यासारख्या दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम केले होते. त्यांच्यातील कला दिग्दर्शक सातत्याने नवे प्रयोग करत होता. यातूनच त्यांनी २००५ मध्ये कर्जतमध्ये ५२ एकरच्या मोठ्या जागेवर त्यांचा महत्त्वाकांक्षी 'एनडी स्टुडिओ' उघडला. अनेक भव्य सेटस् त्यांनी या स्टुडिओत उभे केले. याच सेटवर त्यांनी 'बाजीराव मस्तानी' ही ऐतिहासिक विषयावरील टीव्ही मालिकेची निर्मिती केली. अनेक ऐतिहासिक चित्रपटांसाठी या स्टुडिओतील सेटचा वापर झाला. इतकेच नाही तर तर 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचे अनेक सीझन एनडी स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आले होते.
चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारे कला दिग्दर्शक- नितीन देसाई उर्फ नितीन चंद्रकांत देसाई हे अचाट प्रतिभा असलेले कला दिग्दर्शक होते. त्यांनी आजवर केलेल्या कामाच्या यादीवर केवळ नजर फिरवली तरी त्यांचा आवाका लक्षात येतो. त्यांनी परिंदा, 1942: एक प्रेम कथा, अकेले हम अकेले तुम, मुन्नाभाई M.B.B.S यासारख्या विविध चित्रपटांमध्ये त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, देवदास, फॅशन, इश्किया, स्वदेस आणि लगान यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे. नितीन देसाई यांना 'हम दिल दे चुके सनम', 'लगान', 'देवदास' आणि 'बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटांसाठी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
कला दिग्दर्शनाची सुरुवात नितीश रॉय यांच्यापासून - नितीन देसाई हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून परिचीत होते. मुंबईत मुलुंडमध्ये जन्मलेल्या नितीन देसाई यांनी मुलुंडच्या वामनराव मुरंजन हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी फोटोग्राफी शिकली. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये एंट्री केली. नितीन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कला दिग्दर्शक नितीश रॉय यांच्यासोबत १९८७ मध्ये गाजलेल्या तमस या मालिकेपासून केली. त्यावेळी ते नितीश रॉय यांचे चौथे सहाय्यक होते.
नितीन रॉय यांच्या टीममध्ये सामील होण्यापूर्वी नितीन देसाई मुंबईच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये गेले होते. जिथे त्यांनी स्टिल फोटोग्राफीच्या 2D स्वरूपातून कला दिग्दर्शनाच्या 3D जगाकडे स्वतःला वळवले. पुढे त्यांनी ‘कबीर कबीर’ आणि ‘चाणक्य चाणक्य’ या टीव्ही मालिकांसाठी काम केले. नितीन देसाई यांनी 'अधिकारी ब्रदर्स' 'भूकंप' (१९९३) द्वारे चित्रपटांमध्ये पदार्पण केले. विधू विनोद चोप्रा विधु विनोद चोप्रा यांच्या १९९४ मध्ये आलेल्या ‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने त्यांची ओळख झाली. पुढे त्याने 'अकेले हम अकेले तुम अकेले हम अकेले तुम' , 'विजेता' , 'खामोशी खामोशी : द म्युझिकल' असे बरेच काही बॉलिवूड चित्रपट केले. नितीन मुख्यतः टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' आणि 'लगान' (२००१), देवदास देवदास (२००२) आणि 'जोधा अकबर जोधा अकबर' (२००८) या सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन आणि सेट डिझाइनिंगसाठी ओळखले जातात.
अनेक पुरस्कारंचे मानकरी नितीन देसाई - नितीन यांना '1942: अ लव्ह स्टोरी', 'खामोशी' आणि 'देवदास'साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला आहे. ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी त्यांना आयफा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार आणि सहा चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी स्क्रीन अवॉर्ड मिळाले आहेत. २००९ मध्ये ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांतून सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.
स्लमडॉग मिलेनियरच्या सेटचे डिझाईन - 'सलाम बॉम्बे!', 'अमोक' (एक फ्रेंच चित्रपट), 'साच अ लाँग ट्रिप' आणि 'होली स्मोक' (कॅनेडियन चित्रपट) आणि स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरही नितीन यांच्या कामाची दखल घेतली गेली. या चित्रपटचासाठी त्यांनी दोन सेट डिझाईन केले होते. एकात कौन बनेगा करोडपती आणि दुसऱ्यात ताजमहालमधील आतील भाग दाखवण्यात आला होता.
नितीन यांनी त्यांचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले; ज्या अंतर्गत त्यांनी २००३ मध्ये 'देश देवी माँ आशापुरा' हा पहिला चित्रपट तयार केला. नंतर २००५ मध्ये त्यांनी कर्जत येथे ND स्टुडिओ या नावाने स्टुडिओ उघडला, जो ५२ एकरात पसरला आहेत्यानंतर त्यांनी ‘राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती’ ही मराठी हिट मालिका तयार केली. त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि त्यावरील चित्रपटांची निर्मिती केली.
नितीन देसाईंना मिलालेले महत्त्वाचे पुरस्कार -
फिल्मफेअर पुरस्कार
१९९५ : सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक कलर 1942: एक प्रेम कथा