महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मेरी ख्रिसमसचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित,जाणून घ्या तारीख - मेरी ख्रिसमस

Merry Christmas Trailer Date : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय विजय सेतुपतीचा आगामी 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचे दोन पोस्टर सध्या रिलीज करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख दिली गेली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 20 जानेवारी 2024ला रिलीज होणार आहे.

Merry Christmas Trailer Date
मेरी ख्रिसमसची ट्रेलर रिलीज डेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 11:10 AM IST

मुंबई - Merry Christmas Trailer Date : अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती साऊथ अभिनेता विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. आता अनेकजण या दोघांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर कधी जाहीर होणार याबद्दलची अपडेट दिली आहे. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाद्वारे कतरिना कैफ आणि विजय सेतुपती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'मेरी ख्रिसमस'च्या पोस्टरनं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकतेच या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले.

'मेरी ख्रिसमस'चं पोस्टर रिलीज : या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलंय. 'मेरी ख्रिसमस'हा चित्रपट हिंदी आणि तमिळमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय अभिनेत्री राधिका आपटे, संजय कपूर आणि विनय पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट एक ट्विस्टी, सस्पेन्सफुल थ्रिलर असल्याचं म्हटलं जातं आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारांमध्ये या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट कधी होणार प्रदर्शित : 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपटाचा ट्रेलर 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विजय शेवटी 'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत दिसला होता. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. तो आता 'सालार', 'तमिळ गांधी चर्चा', 'इदम पोरुल इवल' , 'महाराजा', 'ट्रेन', 'सूधू कव्वम 2' आणि 'पिसासू 2'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे कतरिना शेवटी 'टाइगर 3'मध्ये सलमान खानसोबत दिसली होती. आता ती 'चंदू चॅम्पियन' आणि 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'मधील पहिलं धमाल गाणं लॉन्च
  2. लंडनमधील मादाम तुसाद संग्रहालयात रणवीर सिंगनं त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबत दिली पोझ
  3. रणवीर सिंगच्या उर्जेबद्दल अजय देवगण म्हणतो, 'त्याचं तोंड बंद करावं किंवा आपले कान झाकावे'

ABOUT THE AUTHOR

...view details