मुंबई - Merry Christmas title track : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चा टायटल ट्रॅक ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. संगीतकार प्रीतमने हे गाणे तयार केले आहे आणि अॅश किंगने ते गायले आहे. 'बदलापूर' आणि 'अंधाधुन' फेम दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हे गाणे टिप्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर " मेर ख्रिसमसचे द परफेक्ट गाणे येथे आहे. 12 जानेवारी रोजी चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे" अशा शीर्षकासह हे गाणं शेअर करण्यात आलंय. गाण्यात अंधाधुन संगीताची अनुभूती देणारा रेट्रो वाइब आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली होती. चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांनी रोमान्सच्या क्लासिक रचनेसह, एका आकर्षक कथेसह प्रेक्षकांन प्रभावित केले आहे. या चित्रपटात विजय आणि कतरिनाची केमिस्ट्री रोमांचक आहे आणि प्रेक्षकांना ती नक्की आवडेल असा विस्वासही निरमात्यांना वाटतो.
ट्रेलरमध्ये विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांना अनोळखी व्यक्ती म्हणून दाखवले आहे. मुंबईत ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ते एकमेकांना भेटतात. हा चित्रपट फसवणूक, कारस्थान आणि खून या कथानकाभोवती फिरतो. हे रहस्यवादी घटक राघवनच्या मागील पाच चित्रपटांपैकी चार चित्रपटांमध्ये देखील दिसले आहेत, ज्यात जॉनी गद्दार, बदलापूर आणि अंधाधुन यांचा समावेश आहे.
चित्रपटाबद्दल बोलायचे तर, मेरी ख्रिसमस दोन भाषांमध्ये चित्रित करण्यात आला आहे आणि त्यात विविध प्रकारचे सहाय्यक कलाकार आहेत. हिंदी आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिन्नू आनंद सह-कलाकार आहेत, तर राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स तमिळ आवृत्तीमध्ये सह-कलाकार आहेत. या चित्रपटात परी या बालकलाकाराचीही ओळख प्रेक्षकांची होणार आहे.