महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संक्रांतीला रिलीज होणार कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' - मेरी ख्रिसमस चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर

Merry Christmas: श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमस चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Merry Christmas
कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस'

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 4:55 PM IST

मुंबई - Merry Christmas: कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाची प्रतीक्षा तमाम चाहते करताहेत. त्यांच्यासाठी रिलीज बाबतीत एक अपडेट पुढे आलीय. 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचं रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करुन रिलीजची नवीन तारीख घोषित केली आहे.

पोस्टरसोबत 'मेरी ख्रिसमस'च्या निर्मात्यांनी लिहिले, " तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेला क्षण जवळ जवळ आला आहे! मेरी ख्रिसमस हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी तुमच्या हिवाळ्याचा आनंद द्विगुणीत करणार आहे. यापूर्वी मेरी ख्रिसमस 8 डिसेंबर 2023 रोजी केला जाणार होता, मात्र आता हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.

'मेरी ख्रिसमस'च्या टीमनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आपण प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलंय. लिहिलंय, "प्रत्येक चित्रपट निर्मात्याप्रमाणेच आम्ही या चित्रपटावर प्रचंड निष्ठेने काम केलंय. परंतु काही चित्रपट सलग प्रदर्शित झाल्यामुळे आणि 2023 च्या अखेरचे दोन महिने ठप्प झाल्यानं आम्ही या चित्रपटाच्या रिलीजला विलंब करण्याचं ठरवलंय. आनंदाचा हंगाम आणि आमच्या चित्रपटाची सुरूवात 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये होईल."

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' ही चित्रपट 'जॉनी गद्दार', 'बदलापूर' आणि 'अंधाधुन'च्या दिग्दर्शकाच्या अनोख्या स्टाईलची एक कथा आहे. यातील प्रत्येक चित्रपट हे जसे एकमेकांपासून वेगळे आहेत तसे वेगळे असण्याची हमी या चित्रपटाच्या निमित्तानं निर्माते देताहेत. शिवाय, मेरी ख्रिसमस हा चित्रपट दोन भाषांमध्ये चित्रित करण्यात आली आहे, ज्यामध्ये बॉलिवूड आणि दक्षिण भारतातील अनेक सहकलाकारांचा समावेश आहे.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिन्नू आनंद सह-कलाकार आहेत, तर तमिळ आवृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, चित्रपटात अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटेही कॅमिओ भूमिकेत झळकणार आहेत.

हेही वाचा -

1. Koffee With Karan 8: करणच्या चॅट शोमध्ये 'नणंद भावजयी'ची जोडी : रॅपिड फायर प्रश्नांनं उडवली धमाल

2.Tiger 3 Box Office Collection Day 4: सलमान खान कतरिना कैफच्या 'टायगर 3' ची भाऊबीजेला घसरण

3.Bigg Boss 17 Day 33 Highlights: अंकिता लोखंडे गरोदर असल्याची चिंता, बिग बॉसमध्ये रंगलं नवं नाट्य

ABOUT THE AUTHOR

...view details