मुंबई -Allu Arjun shares memories : तेलगू स्टार अल्लू अर्जुनला मंगळवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, याबद्दल त्यानं कृतज्ञता व्यक्त केलय आणि पुरस्कार सोहळ्यातील अनेक आठवणी शेअर केल्या. त्याच्या गाजलेल्या 'पुष्पा: द राइज - पार्ट 1' या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान केला. आजवरच्या तीन दशकाच्या कारकिर्दीत अल्लू अर्जुनला मिळालेला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यानं पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो पोस्ट केले आलिहिलं की, 'माझ्या सर्वात आवडत्या लोकांसोबतचा हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील संस्मरणीय दिवस.'
अल्लू अर्जुननं संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आणि लिहिलंय, 'माझ्या बालपणीच्या मित्रासह, माझे संगीत दिग्दर्शक, माझे हितचिंतक आणि माझ्या चीअर लीडरसह हा पुरस्कार स्वीकारणं खूप संस्मरणीय होतं खूप आनंद झाला आहे की आम्ही आमच्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराचं एकत्र स्वागत केल. चेन्नईच्या रस्त्यांपासून दिल्ली सभागृहापर्यंतचा हा २५ वर्षांचा प्रवास आहे.' 'पुष्पा' चित्रपटाच्या म्यूझिक स्कोअरसाठी संगीतकार देवी श्री प्रसाद यांनाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. हा प्रसंग मित्र अल्लु अर्जुनसाठी संस्मरणीय वाटतोय.
अल्लू अर्जुननं आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले की, 'राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान मिळालायासाठी माझा विचार केल्याबद्दल ज्युरी, मंत्रालय, भारत सरकारचे आभार मानायचे आहेत. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक पातळीवर मैलाचा दगड नाही तर ज्यांनी आमच्या सिनेमाला पाठिंबा दिला आणि त्याची कदर केली त्या सर्व लोकांचा आहे. धन्यवाद, सुर्यकुमार सर...माझ्या यशामागे तुम्हीच कारण आहात.' असं लिहून पुष्पा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आभार मानायला अल्लु अर्जुन विसरला नाही.
या पुरस्कार सोहळ्याळा हजर राहताना अल्लु अर्जुननं पांढरा सूट परिधान केला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी स्नेहा रेड्डीही उपस्थित होती. तिने एक जबरदस्त पारंपरिक सूट घातला होता. ऑगस्टमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर अर्जुनने सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त केली होती.