मुंबई - Mehreen Pirzada : अभिनेत्री मेहरीन पिरजादानं नुकतेच ओटीटीमध्ये पदार्पण केले. डिस्ने हॉटस्टारच्या 'सुलतान ऑफ दिल्ली' या वेबसिरीजमुळे ती चर्चेत आली आहे. या वेब सिरीजला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. वेब सिरीजमधील एक सीन आहे, ज्यामध्ये वैवाहिक बलात्कार दाखवला गेला आहे. मिलन लुथरियनच्या मालिकेबाबत गदारोळ सध्या निर्माण झाला आहे. मेहरीन पिरजादाला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान आता मेहरीन या वादावर मौन सोडले आहे. तिनं आता ओटीटी डेब्यू आणि वेब सीरिजमध्ये केलेल्या 'सेक्स सीन'वर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आता ट्रोल्सच्या शब्दांनाही प्रत्युत्तर दिले आहे.
मेहरीन पिरजादा झाली ट्रोल :मेहरीन पिरजादा ट्रोल करणाऱ्या सांगितलं की, 'स्क्रिप्टच्या मागणीमुळे अनेकदा अशा गोष्टी कराव्या लागतात'. वैवाहिक बलात्काराचे सेक्स सीन म्हणून वर्णन केल्यावर मेहरीनला राग आला आहे. मेहरीन पिरजादानं पुढं सांगितलं, 'अलीकडेच मी 'सुल्तान ऑफ दिल्ली' या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना ही मालिका आवडली असेल. कधीकधी तुम्हाला तुमचे नैतिकता बाजूला ठेवून स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित करावे लागते. स्क्रिप्ट सांगते तसे करावे लागते. मी एक अभिनेत्री आहे. माझे काम पूर्ण जबाबदारीने व प्रामाणिकपणे करणे हे माझे कर्तव्य आहे. मी देखील कहाणीचा भाग आहे'.