मुंबई - Hrithik Roshan birthday : हृतिक रोशन आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत असताना, त्याच्या आगामी चित्रपट 'फायटर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्याला शुभेच्छा देणारा संदेश दिला आहे. चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर करत सिद्धार्थने त्यांच्या दहा वर्षाच्या एकत्र प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
'फायटर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी बॉलिवूड ग्रीक गॉड हृतिक रोशनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला संदेश देऊन सुरुवात केली. त्यांच्या आगामी चित्रपटातील दोन पडद्यामागील फोटो पोस्ट करत, सिद्धार्थने आठवणींच्या जगात फेरफटका मारला. गेली दहा वर्षे दोघे उत्तम मित्र म्हणून वावरत आले आहेत.
एका फोटोमध्ये हृतिक रोशन हवाई दलाच्या काळ्या पोशाखात दिग्दर्शक सिद्धार्थबरोबर फिरताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत दोघे 'फायटर'च्या सेटवर निर्धाराने उभे असलेले दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने गेल्या दहा वर्षातील त्याच्या मैत्रीबद्दल पोस्टमध्ये हृतिककडे कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो व्यक्ती म्हणून कसा वेगळा आहे त्याचा उल्लेख करत त्याच्या दीर्घायुष्यासाठी, यश आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.