हैदराबाद - टॉलिवूडमधील ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांचे गुरुवारी (२ फेब्रुवारी) निधन झाले. दिग्दर्शक विश्च्यावनाथ यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टॉलीवुड सेलिब्रिटी चिरंजीवी, एसएस राजामौली, ब्रह्मानंदम, एमएम कीरावानी आणि कोटा श्रीनिवास राव यांच्यासह इतर दिग्गज चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पोहोचले होते. महान चित्रपट दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या पश्चात पत्नी कासीनाधुनी जया लक्ष्मी, रवींद्रनाथ, नागेंद्रनाथ आणि एक मुलगी पद्मावती यांच्यासह तीन मुले आहेत.
पवन कल्याण याने आज सकाळी दिग्दर्शक त्रिविक्रमसोबत के विश्वनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. त्याचवेळी आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीत दिग्दर्शक कीरावानी यांचा के. विश्वनाथ यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचणाऱ्या पहिल्या काही स्टार्समध्ये समावेश होता. याशिवाय पापाराझीने अभिनेता ब्रह्मानंदम, राजकुमार यांनाही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
के विश्वनाथ यांचे वडिलोपार्जित घर बापटलाच्या रायपल्ले जिल्ह्यातील पेडा पुलिवरू गावात आहे. विश्वनाथ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी काशिनाधुनी सुब्रह्मण्यम आणि सरस्वतम्मा यांच्या पोटी झाला. 2 फेब्रुवारी (गुरुवारी) रात्री उशिरा के. विश्वनाथ यांचे निधन झाले. 'शंकरभरणम', 'सागर संगम', 'स्वाती मुथयम' आणि 'स्वर्ण कमलम' यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांसाठी लोकप्रिय असलेले विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
असे म्हटले जाते की के. विश्वनाथ यांना वयोमानानुसार आजार होता, त्यामुळे गुरुवारी रात्री ते गंभीर आजारी पडले. त्यांना ज्युबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ते आधीच मृत झाल्याचे सांगितले.