मुंबई - Trisha krishnan and Mansoor Ali Khan :'लिओ' अभिनेता मन्सूर अली खान सतत चर्चेत असतो. अभिनेत्री तृषा कृष्णनबाबत त्यानं दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ झालीय. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईही सुरू झालीय. राष्ट्रीय महिला आयोगानंही तामिळनाडू पोलिसांना त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची सूचना केली आहे. मन्सूर अली खाननं एका पत्रकार परिषदेत तृषाबद्दल अभद्र टिप्पणी केली होती, त्यानंतर लोकेश कनगराजनेही आपला संताप व्यक्त करत याबद्दल टीका केली होती. आता राष्ट्रीय महिला आयोगानं या मुद्द्यावर मन्सूरवर कायदेशीर कारवाई केली आहे.
मन्सूर अली खान अडचणीत :नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मन्सूर अलीनं तृषा कृष्णवर टीका करताना म्हटलं होत की, 'लिओ'मध्ये त्यानं भूमिका केली होती, मात्र चित्रपटामध्ये त्याला तृषा कृष्णनसोबत स्क्रीन शेअर करता आली नाही. याशिवाय त्यानं तृषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर तृषानंही याप्रकरणी सडेतोड उत्तर दिलं होतं. तिनं उत्तर देत सोशल मीडियावर लिहलं, 'मी माझ्या करिअरमध्ये त्याच्यासोबत पुन्हा कधीही काम करणार नाही. त्याची इच्छा असेल पण मला त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली नाही, याबद्दल मी आभारी आहे'. मी माझ्या पुढील कारकिर्दीत त्याच्यासोबत कधीही चित्रपट करणार नाही, याची मी काळजी घेईन. त्याच्यासारखे लोक मानवजातीचं नाव बदनाम करतात'.