मुंबई - 2020 मध्ये मनोज बाजपेयीने सादर केलेल्या जातीय सलोख्याचा संदेश देणाऱ्या कवितेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही संकल्पना आणि कविता ज्यांनी लिहिली होती ते चित्रपट निर्माते मिलाप झवेरी यांनी ही कविता सध्याच्या काळातील लोकापर्यंत पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
भगवान और खुदा या दोन मिनिटांच्या या कवितेमध्ये धर्मांमधील संघर्षाच्या अकार्यक्षमतेला संबोधित करण्यात आले आहे. कविता सादर करताना बाजपेयी म्हणतात, "भगवान और खुदा आपस में बात कर रहे थे, मंदिर और मस्जीद के बीच चौराहे पर मुलाकात कर रहे हैं थे, की हात जोडे हुए हो या दुआ मे उठे, कोई फरक नही पडता है.''