महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gulmohar Movie : गुलमोहर चित्रपटाची काहानी ऐकून मनोज बाजपेयी भावूक! कुटुंबाची सांगितली आठवण - गुलमोहर चित्रपटाची काहानी ऐकून मनोज बाजपेयी

कौटुंबिक नातेसंबंध, भावनिक पैलू आणि सामूहिक कुटुंबात राहणाऱ्या प्रियजनांच्या मन:स्थितीचे सुंदर चित्रण करणारा गुलमोहर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांमध्ये चर्चेचा भाग झाला आहे. 12 वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करताना, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि सुपरस्टार मनोज बाजपेयी यांनी गुलमोहर की खुशबू या कौटुंबिक संवादाचे कथा कथन केले आहे.

Gulmohar Movie
गुलमोहर चित्रपटाची काहानी

By

Published : Feb 20, 2023, 9:00 PM IST

मुंबई : गुलमोहर हा चित्रपट रिलीजपूर्वीच त्याची कथा आणि स्टारकास्टमुळे खूप चर्चेत आला आहे. दररोज गुलमोहर चित्रपटाशी संबंधित कथा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका खास संवादात अभिनेता मनोज बाजपेयीने सांगितले की, तो गुलमोहर चित्रपटाच्या कथेत मी माझ्या कुटुंबाची कथा पाहतो. मनोज म्हणतो, माझ्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबासाठी खूप विचार केला होता. त्यांना सर्वांना एकत्र राहायचे होते. आणि त्याच विचाराने त्यांनी यातील सर्व तपशीलांकडे लक्ष देऊन घर बांधले. परंतु, त्यांच्या सर्व मुलांच्या आयुष्यात सध्या वेगवेगळे मार्ग आहेत.

भावंडांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करतो : समाज आणि कुटुंबांमधील बदलत्या नातेसंबंधांबद्दल बोलताना मनोज बाजपेयी आपल्या भावंडांची आठवण करून सांगतात, आता आपल्या सर्वांमध्ये भावंडांचे औपचारिक नाते आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यस्त झाला आहे. कोणालाच कोणासाठी वेळ नाही, पण मी नेहमी माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना महिन्यातून एकदा भेटण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हाही दिल्लीला जातो तेव्हा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सर्व भावंडं एकाच ठिकाणी जमतात आणि एकत्र जेवतात. निदान या बहाण्याने तरी मी माझ्या भावंडांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करतो.

नातेसंबंध मोठ्या अडचणीचे : समाज आणि कुटुंबांमधील बदलत्या नातेसंबंधांबद्दल बोलताना मनोज बाजपेयी म्हणतात, आज कोण कुणासाठी धावतोय हे काही लक्षात येत नाही. मात्र, सर्वजण धावताना दिसत आहेत. कुणाला आपली भावंड, आपले आई-वडिल आपली जवळची माणस हे काहीच कळत नाही. फक्त काम आणि काम अशी परिस्थिती झाली आहे. आणि यामुळे सर्वत्र नातेसंबंध मोठ्या अडचणीचे झाले आहेत. यामुळे किमान आपण हे लक्षात घ्याव म्हणून मी जेव्हाही दिल्लीला जातो तेव्हा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सर्व भावंडे एकाच ठिकाणी जमतात आणि जेवतात. एकत्र निदान त्यामुळेच मी माझ्या भावंडांसोबत जोडून राहण्याचा प्रयत्न करतो असेही बाजपेयी म्हणाले आहेत.

गुलमोहर 3 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार : चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता अमोल पालेकर, अभिनेत्री सिमरन, सूरज शर्मा, कावेरी सेठ आणि उत्सव झा यांचा समावेश आहे. गुलमोहर 3 मार्च 2023 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कुटुंबाची थिम असल्याने त्याबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. तसेच, यामध्ये मोठी-मोठी कलाकार असल्याने या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :कन्नडमध्ये जेम्स बाँड स्टाईल चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक एसके भगवान यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details