नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या रेडिओ शोच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रसार भारतीच्या वतीने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या लोकांशी संवाद साधला अशा १०० लोकांना आमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार आमिर खान, आणि अभिनेत्री रवीना टंडन यांना बोलवण्यात आले होते. आमिर खानने यावेळी सांगितले की, पंतप्रधान करत असलेला मन की बात हा शो ऐतिहासिक आहे.
मन की बातचे आमिरने केले कौतुक - 'मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा लोकांच्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. पंतप्रधानांनी ही एक ऐतिहासिक अशी गोष्ट केली आहे.', असे आमिर खान म्हणाला. येत्या ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमाच्या १०० वा भागात देशाला उद्देशून बोलणार आहेत. प्रसार भारतीने याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. आमिर खान, रवीन टंडनसह संगीतकार रिक्की केज, खेळाडू दीपा मलिक, निकहत झरीन, पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदी उपस्थित होते.