महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील रंधावा पॅराडाइजमध्ये झाला होता खून ? जाणून घ्या सत्य

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं शूटिंग ग्रेटर नोएडा येथील फार्म हाऊसमध्ये करण्यात आलं होतं. या फार्म हाऊसमध्ये एका व्यक्तीचा खून झाला होता.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 12:29 PM IST

Updated : Nov 30, 2023, 12:54 PM IST

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
रॉकी और रानी की प्रेम कहानी

मुंबई - Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन काही महिने झाले आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. या मल्टीस्टारर चित्रपटात ताजमहालासारख्या चमकणाऱ्या पांढऱ्या हवेलीकडे सर्वांचं लक्ष गेलं असावं. या हवेली संदर्भात एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हवेलीमध्ये एका 55 वर्षीय अशोक यादव नावाच्या व्यक्तीची 27 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

रंधावा पॅराडाइजमध्ये झाला खून :ग्रेटर नोएडा येथील या आलिशान वाड्यात लग्नसमारंभ सुरू असताना अशोक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर 51 ब्लॉक एच रेसिडेंटस् वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य अशोक नोएडा सेक्टर 51 मध्ये राहत होते. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या शूटिंगनंतर ग्रेटर नोएडा येथील नोएडा एक्स्टेंशनच्या सेक्टर 1 मध्ये असलेला हा रंधावा पॅराडाइज चर्चेत आला आहे. सेंट्रल नोएडा डीसीपी सुनीती यांनी मृताची ओळख अशोक यादव अशी केली आहे. याशिवाय आरोपीचं नाव शेखर असल्याचं सांगितलं आहे.

करण जोहरच्या चित्रपटाचं शूटिंग :या चित्रपटाद्वारे करण जोहरनं अनेक वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केलं. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं मुख्य शूटिंग याच वास्तूत झालं आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे 19-29 कोटी रुपये आहे. या हवेलीचे मालक गौर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर आहे. ही हवेली ग्रेटर नोएडा सेक्टर 1 मध्ये आहे. याशिवाय ही हवेली 35 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे, ज्यामध्ये बाग आणि कारंजे देखील आहेत.

हेही वाचा :

  1. इम्फाळमध्ये रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचा पारंपारिक पद्धतीनं विवाह सोहळा पडला पार
  2. 'कांतारा'च्या नावावर आणखी एक पुरस्कार; कन्नड चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास
  3. 'कबीर सिंग'साठी रणवीर सिंगनं दिला होता नकार; संदीप रेड्डी वंगानं केला खुलासा
Last Updated : Nov 30, 2023, 12:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details