महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Malayalam actor Prithviraj Sukumaran injured : पृथ्वीराज सुकुमारन 'विलायथ बुद्धा'च्या शूटिंगदरम्यान कार अपघातात जखमी - Malayalam actor Prithviraj Sukumaran injured

'विलायथ बुद्धा' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, मल्याळम स्टार पृथ्वीराज सुकुमारन जखमी झाला. या अपघात त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

Prithviraj Sukumaran
पृथ्वीराज सुकुमारन

By

Published : Jun 26, 2023, 3:20 PM IST

मुंबई : मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांचा आगामी चित्रपट 'विलायथ बुद्धा'च्या शूटिंगदरम्यान कार अपघातात जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीराजला पायाला दुखापत झाली आहे. पृथ्वीराजवर २६ जून रोजी कोचीच्या रुग्णालयात पायावर की-होल शस्त्रक्रिया करणार आहे. अपघातानंतर, डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी कामातून काही आठवडे सुट्टी घेण्याचा सल्ला दिला आहे. या चित्रपटात पृथ्वीराज व्यतिरिक्त अनु मोहन आणि प्रियमवदा कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अपघाताचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत. याआधी, तमिळ अभिनेते विशाल आणि विजय अँटोनी हे कलाकर देखील जखमी झाले होते, मात्र आता दोघेही बरे झाले आहे. चित्रपटाच्या सेटवरील असंख्य दुर्घटनांमुळे उत्पादन कंपन्यांनी लागू केलेल्या सुरक्षा प्रक्रियेबद्दल चिंता निर्माण केली आहे. तसेच हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पृथ्वीराज सुकुमारन अ‍ॅक्शन सीन दरम्यान जखमी झाला :इडुक्कीमधील मरूर येथे चित्रपटाच्या सेटवर अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना पृथ्वीराज जखमी झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, हा अपघात सकाळी१०.३० वाजता झाला. तेव्हा पृथ्वीराज हा केएसआरटीसी (KSRTC) बसमध्ये शूटिंग करत होता. अपघातानंतर, त्याला प्रथम जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर तेथून पृथ्वीराज उपचारासाठी कोची येथे नेण्यात आले.

पृथ्वीराजच्या कीहोलची आज शस्त्रक्रिया होणार आहे : सध्या, तो कोचीमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल आहे आणि आज २६ जून, रोजी त्याच्या कीहोलची शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान, पृथ्वीराजला बरे होण्यासाठी काही महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागणार आहे, त्यामुळे 'विलायथ बुद्ध' या चित्रपटाचे शूटिंग तात्पुरते थांबवले जाईल. जयन नांबियार दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग या महिन्यात संपणार होते.

पृथ्वीराजांच्या 'विलायथा बुद्ध'ची कहाणी काय आहे? :मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'विलायथ बुद्धा' हा चित्रपट मरायुरमधील चंदन चोरीच्या कथेभोवती फिरणारी आहे. याशिवाय पृथ्वीराज हा प्रशांत नील दिग्दर्शित ‘सलार’ या चित्रपटात प्रभाससोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Upasana's emotional predelivery video : आई झाल्याचा आनंद मावेना! राम चरणची पत्नी उपासनाने शेअर केले खास फोटो
  2. Sudipto Sen announce Bastar : द केरळ स्टोरीनंतर सुदीप्तो सेन नक्षलवादावर बनवणार चित्रपट
  3. Adipurush box office day 10 collection: बॉक्स ऑफिसवर आदिपुरुषला थोडा दिलासा, रविवारी कमाईतही वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details