महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Malavika Mohanan pictures : मालविका मोहननने मदुराईमधील थंगालनच्या सेटवरून शेअर केले विहंगम फोटो - Thangalaan set in Madurai

मालविका मोहननने तिच्या इंस्टाग्रामवर मदुराईमधील चित्तथरारक फोटो शेअर केली. सुंदर सूर्यास्त, खडकाळ पर्वत, पाऊस, ढग आणि चंद्र यांचे हे सुंदर फोटो मंत्रमुग्ध करणारे आहेत.

Malavika Mohanan pictures
मालविका मोहनन

By

Published : Jul 3, 2023, 3:17 PM IST

मुंबई- अभिनेत्री मालविका मोहनन सध्या मदुराईमध्ये तिच्या आगामी 'थंगलान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतली आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. आपल्या कामाबद्दल आणि खासगी आयुष्यातील खास घडामोडी ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या ती मदुराईमध्ये शुटिंग करत असून या सुंदर लोकेशनवरील फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोत तिने शुटिंगचे स्थळ दाखवताना, क्रू करीत असलेले काम, निसर्गाची विविध रुपे आणि आकाशाचे विलोभनीय फोटो तिने शेअर केलेत.

मदुराईतील मालविकाचे सुंदर फोटोशूट - मदुराईतले आकाशाशी जडलेले प्रेम, यातील चौथा फोटो आमच्या शुटिंगनंतर संध्याकाळी आकाश जेव्हा गडगडाटासह रोमान्स करत असताना टिपलेला आहे. अशा आशयाच्या कॅप्शनसह मालविकाने सुंदर आकाश, सूर्यास्त, पर्वत आणि गडगडाट यांनी मंत्रमुग्ध करणारे फोटो शेअर केलेत. अभिनेत्री मालविका मोहनन निसर्गाचा उत्तम आनंद घेत आहे. तिने शूटिंग संपल्यानंतर तिच्या चित्रपटाच्या सेटवरून मेघगर्जना आणि विजेचा टाइम-लॅप्स व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोंसाठी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून प्रेमाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तिने शेअर केलेले सुंदर फोटो चांहत्यांना फार आवडले आहेत. कामाच्या आघाडीवर, मालविका मोहनन सध्या पा रंजित-दिग्दर्शित थंगलान चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहे. यामध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तयार होण्यासाठी मालविकाला 2 ते 3 तास लागतात. यापूर्वी शेअर केलेल्या पोस्टवरुन तिने हा दाखवून दिले होते.

कोण आहे मालविका मोहनन - मालविका मोहनन हिने मल्याळम आणि तमिळ चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिने पट्टम पोल या मल्याळम चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर इराणी फिल्मचे ख्यतनाम दिग्दर्शक माजिद मजीदी यांच्या फिल्म बियॉन्ड द क्लाउड्स या हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे जगभरातील प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली. त्यानंतर तिने द ग्रेट फादर , पेट्टा आणि मास्टर या हिट दाक्षिणात्य चित्रपटातून दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details