मुंबई - Malaika Arora pens cryptic note :अभिनेत्री मलायका अरोराने 24 डिसेंबर रोजी तिचा माजी पती अरबाज खानच्या शशुरा खानसोबत दुसरे लग्न केल्यानंतर एक चिठ्ठी शेअर केली आहे. 19 वर्षे अरबाजसोबत संसार करणाऱ्या मलायकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक चिठ्ठी पोस्ट केली आहे. यात तिने प्रेमाच्या विषयावर तिचे विचार व्यक्त केले आहेत.
सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "एखाद्या अशा व्यक्तीच्या प्रेमात पडा जो तुमची सुरक्षित जागा आणि तुमचे सर्वात मोठे साहस दोन्ही असेल." तिला या संदेशातून नेमकं काय सूचवायचं आहे याचा विचार करताना तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.
24 डिसेंबरच्या संध्याकाळी मलायका ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी तिच्या मित्र आणि कुटुंबासोबत सामील झाली आणि इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करून हा प्रसंग सर्वांसमोर फोटोच्या माध्यमातून ठेवला. त्याच दिवशी मलायकाचा माजी पती अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शशूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहान खान या लग्नाला उपस्थित होता. लग्नानंतर तो आरामात ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी त्याच्या आईसोबत सामील झाला.