मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर अखेर रिलीज झाला आहे. आशिकों, मी परत आलो आहे, असे म्हणत आयुष्मान खुरानाने टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ड्रीम गर्ल २ चा ट्रेलर उद्या रिलीज होणार असल्याचेही त्याने चांहत्यांना कळवले आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान हा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी रूपेरी पडद्यावर दाखल होत आहे. 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाच्या नवीन टीझरमध्ये आयुष्मान हा आपल्या हटके अंदाजात दिसत आहे. तर निर्मात्यांनी अनन्या पांडेचा 'ड्रीम गर्ल २' मधील फर्स्ट लुक रिलीज करून चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. २०१९मध्ये आलेला 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने चाहत्यांच्या मनाला हळूवार स्पर्श केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि त्यात पूजा बनलेल्या आयुष्मान खुरानाने चाहत्यांची मने जिंकली होती. आता प्रेक्षक 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. आयुष्मान खुरानाने 'ड्रीम गर्ल २' च्या माध्यमातून प्रेक्षकांना त्याची पहिली झलक दाखवली आहे.
चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी निवडला एक अनोखा मार्ग :आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट गेल्या वर्षभरापासून चर्चेत होता. सध्या हा चित्रपट रिलीजच्या तयारीत आहे. दरम्यान निर्मात्यांनी 'ड्रीम गर्ल २'चे प्रमोशन करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे. गेल्या वर्षभरापासून पूजा नावाची मुलगी तिच्या प्रियकराला भेटण्याचे आश्वासन देत होती, मात्र आजपर्यत ती कोणाला दिसली नाही. पुजाच्या प्रियकरांच्या यादीत शाहरुख सलमान आणि रणवीर सिंगपर्यंत अनेक सुपरस्टार्स आहेत.