मुंबई - Mahesh Bhatt and Ranbir Kapoor : सध्या अभिनेता रणबीर कपूर त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान शोच्या निर्मात्यांनी महेश भट्टचा संदेश रणबीर कपूरला दाखवला. या संदेशात महेश भट्टनं जावयाचे खूप कौतुक केले आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये महेश भट्टनं म्हटलं, 'माझी मुलगी आलिया म्हणते की रणबीर एक उत्तम अभिनेता आहे. पण मी त्याला जगातील सर्वोत्कृष्ट बाप मानतो. तो राहाकडे ज्या नजरेनं पाहतो त्याच्या डोळ्यातलं भाव तुम्हाला दिसले असतील. त्याची आई नीतू सांगते की आई आपल्या मुलींवर ज्याप्रमाणे प्रेम करते त्याप्रमाणे, रणबीर राहावर प्रेम करतो. मला रणबीर कपूरसारखा जावई मिळाला याचा मला अभिमान वाटतो'.
रणबीर महेश भट्टसाठी म्हटलं : महेश भट्टचा हा मेसेज पाहून रणबीर म्हटलं की, 'ते माझ्यासमोर अशा गोष्टी कधीच बोलल्या नाहीत. त्यामुळे मी 'इंडियन आयडॉल'चे आभार मानू इच्छितो. मी माझ्या सासरी पास झालो आहे'. रणबीरचा 'अॅनिमल ' चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, सौरभ सचदेवा, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर अनेकजणांना आवडला आहे.