मुंबई - Mahesh Babu : साऊथ अभिनेता महेश बाबू स्टारर अॅक्शन चित्रपट 'गुंटूर कारम' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 42 कोटीची कमाई केली आहे. 'गुंटूर कारम'नं जगभरात 100 कोटीचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 12 जानेवारी रोजी रिलीज झाला. महेश बाबू यांनी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन केलं. दरम्यान महेश बाबूनं 'गुंटूर कारम'च्या यशाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत महेश बाबूनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''संक्रांतीच्या शुभेच्छा, ब्लॉकबस्टर सेलिब्रेशन, गुंटूर कारम.''
'गुंटूर कारम' कलेक्शन :महेश बाबूनं शेअर केलेल्या फोटोत पत्नी नम्रता शिरोडकर आणि 'गुंटूर कारम' चित्रपटामधील मुख्य अभिनेत्री श्रीलीला दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये दिल राजू, वामसी आणि मीनाक्षी चौधरीही या चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. फोटोमध्ये महेश बाबू गुलाबी शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसत आहे. दुसरीकडे नम्रतानं ऑलिव्ह कलरचा ड्रेस घातला आहे. याशिवाय 'गुंटूर कराम' फेम अभिनेत्री श्रीलीलानं सुंदर पिवळ्या रंगाचा शरारा परिधान केला आहे. आज 16 जानेवारीला हा चित्रपट रिलीजच्या 5 व्या दिवशी जात आहे. सॅकनिकलच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं देशांतर्गत आतापर्यत 83.40 कोटीची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात 'गुंटूर कारम'नं 164 कोटीचा व्यवसाय केला आहे. 'गुंटूर कारम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लवकरच 200 कोटीचा टप्पा लवकरच गाठणार असं सध्या दिसत आहे.