महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sitaras Times Square debut : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकली सितारा, आई वडिलांचा आनंद भिडला गगनाला - Sitara Times Square debut

महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामानेनीने न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकलेल्या जाहीरातीवर पदार्पण केल्यामुळे त्याला अभिमान वाटत आहे. महेश आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकरने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लेकीचे कौतुक केले आहे.

Sitaras Times Square debut
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकली सितारा

By

Published : Jul 4, 2023, 4:13 PM IST

मुंबई- सामान्य आई बापाला मुलींने मिळवलेल्या यशाबद्दल जितका अभिमान वाटतो तितकाच अभिमान तेलुगु सुपरस्टार महेशबाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकरला वाटला आहे. त्यांची मुलगी सितारा अमेरिकेच्या प्रतिष्ठीत टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकलेल्या जाहिरातीमध्ये दिसत आहे. ११ वर्षे वयाची लेक सितारा घट्टामनेनीची जाहिरात पाहून आईबापांचा ऊर भरुन आलाय. महेश बाबू आणि नम्रताने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमधील लेकीच्या जाहिरातीचे फोटो शेअर करत आपल्या छोट्या राजकुमारीवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मंगळवारी महेश बाबूने इंस्टाग्रामवर सिताराच्या टाइम्स स्क्वेअर पदार्पणाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. अभिमानाने सुंदर कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, 'टाइम्स स्क्वेअरला प्रकाश देत आहे!! माझ्या फायर क्रॅकरचा मला अभिमान वाटतो. अशीच सतत चमकत राहा, सितारा घट्टामानेनी.' मेहेशची पत्नी नम्रता हिनेही हाच फोटो आणि व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि आपल्या मुलीचे कौतुक केले. सिताराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नम्रताने लिहिले की, 'टाइम्स स्क्वेअरवर नुकतेच कोणाचे पदार्पण झाले ते पहा! मला तुझा किती आनंद आणि अभिमान आहे हे शब्दात व्यक्त करता येणार नाहीत! पालक म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान वाटतो, सितारा.', असे तिने लिहिलंय.

महेश आणि नम्रता यांच्या पोस्टनुसार, त्यांच्या मुलीने हैदराबाद येथील प्रस्थापित ज्वेलरी ब्रँडचे समर्थन केले आहे. या जाहिरातीमध्ये सितारा कलाकुसर असलेल्या पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांनी नटलेली दिसत आहे. महेशची लाडकी मुलगी ग्लॅमरच्या जगाकडे पूर्णपणे झुकलेली दिसते आहे. अलिकडेच सिताराने सरकारू वारी पाता मधील पेनी गाण्याद्वारे पदार्पण केले आहे. सिताराचे तिच्या नावाचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे. सितारा घटामनेनी इंस्टाग्रामवर देखील तिची उपस्थिती जाणवते जिथे ती मनोरंजक रील आणि नृत्य व्हिडिओ शेअर करत असते.

सितारा घट्टामानेनी हिला आई वडील व त्यांच्या पूर्वजांकडून अभिनयाचा वारसा लाभलाय. महेश बाबू हा तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय सुपरस्टार आहे. असंख्य सुपरहिट सिनेमा त्याच्या नावावर आहेत. सिताराची आई नम्रता शिरोडकर ही एकेकाळची आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री राहिली आहे. विशेष म्हणजे महेश बाबूचे वडिल दिवंगत अभिनेता कृष्णा हे साऊथचे सुपरस्टार होते. नम्रताची आजी मिनाक्षी शिरोडकर या नामवंत मराठी अभिनेत्री होत्या. १९३८ मध्ये रिलीज झालेल्या ब्रम्हचारी चित्रपटात त्यांनी स्विमसूटमध्ये शॉट दिला होता. त्याकाळात पडद्यावर तोकड्या कपड्यात दिसलेल्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details