मुंबई - Jigarthanda Double X teaser Out :'जिगरठंडा डबल एक्स' या चित्रपटाचा टीझर हा सोमवारी रिलीज करण्यात आला. कार्तिक सुब्बाराज लिखित आणि दिग्दर्शित 'जिगरठंडा डबल एक्स'चं शूटिंग मदुराईमध्ये पूर्ण झालं. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे.'जिगरठंडा डबल एक्स'चा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची आतुरता वाढली आहे. दोन मिनिट, छत्तीस सेकंदाच्या टीझरमध्ये खूप अॅक्शन दाखवण्यात आलीय.
'जिगरठंडा' चा सीक्वल : एसजे सूर्या आणि राघव लॉरेन्स 'जिगरठंडा डबल एक्स' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'जिगरठंडा' या चित्रपटाचा सीक्वल असलेला हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात दाखल होणार आहे. कार्तकेयन संथनम निर्मित आणि अलंकार पांडियन द्वारे सह-निर्मित, अॅक्शन ड्रामा तमिळ, तेलुगु आणि हिंदीसह तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' देखील दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे.
- 'जिगरठंडा डबल एक्स'चा टिझर : 'जिगरठंडा डबल एक्स'च्या सुरूवातीला 1975चा काळ दाखविण्यात आला आहे. 'जिगरठंडा डबल एक्स' मध्ये राघव लॉरेन्स वेगळ्या लूकमध्ये दिसेल. या चित्रपटाच्या टीझरमध्ये तो अॅक्शन मोडमध्ये आहे. एका हिट चित्रपटासाठी आवश्यक सर्व केमिस्ट्री जुळवण्याचा पूर्ण प्रयत्न दिग्दर्शकानं केलाय.