महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'गुंटूर कारम' पाहणाऱ्या महेश बाबूसह कुटुंबावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव - Guntur Karam Release

Guntur Karam first show on first day : महेश बाबूच्या चाहत्यांनी त्याच्यासह कुटुंबावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला आहे. तो त्याच्या चाहत्यांसह गुंटूर कारम पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला होता. साऊथचा सुपरस्टार असलेला महेश बाबू त्याची पत्नी नम्रता शिरोडकर आणि मुलगी सितारा घट्टामनेनीसोबत दिसला.

Guntur Karam first show on first day
महेश बाबूवर फुलांचा वर्षाव

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 3:35 PM IST

हैदराबाद - Guntur Karam first show on first day : महेश बाबूचा नवा कोरा चित्रपट 'गुंटूर कारम' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर महेश बाबूचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन होत आहे.

'गुंटूर कारम' चित्रपट पाहण्यासाठी दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास आणि एस थमन एकत्र गेले होते. पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी जमलेल्या अलोट गर्दीत सुपरस्टार महेश बाबू पत्नी नम्रता शिरोडकर आणि मुलगी सितारासह पोहोचला. प्रेक्षकांनी त्याच्यावर फुलांसह गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली. याचा व्हिडिओ पापाराझींनी शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना, पापाराझीने लिहिले: "सुपरस्टार महेशबाबू खूप दिवसांनी 'गुंटूर कारम' चित्रपटाचा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी सुदर्शन थिएटरमध्ये आला होता." लाल रंगाचा चेकर्ड शर्ट परिधान केलेला महेश बाबू त्याच्या कॅज्युअल बेस्टमध्ये दिसत होता. दुसरीकडे, नम्रता गुलाबी रंगाचा सूट परिधान करताना दिसली आणि सिताराने जीन्सच्या पांढऱ्या जोडीवर निळा टी-शर्ट निवडला.

महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा लोकप्रिय अ‍ॅक्शन ड्रामा थिएटरमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित या चित्रपटात महेश बाबू, श्रीलीला आणि मीनाक्षी चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महेशने चित्रपटात संवेदनशील भूमिका साकारली आहे. यामध्ये तो शहरातील गुन्हेगारी कारवाया उघड करू पाहणाऱ्या पत्रकाराच्या प्रेमात पडतो.

गुंटूर कारम'चे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास करत आहेत. यापूर्वी अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या या जोडीने अथाडू आणि खलेजा या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. तब्बल 12 वर्षांच्या खंडानंतर ही जोडी या 'गुंटूर कारम' या प्रोजेक्टसाठी एकत्र आली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे; तरीही, महेश बाबूच्या कामगिरीचे समीक्षकांनी कौतुक केले आहे.

'गुंटूर कारम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये महेश बाबूने कोणतीही कसर सोडलेली नव्हती. तेलंगणासह आंध्र प्रदेशांतील वेगवेगळ्या शहरात जाऊन त्याने आपल्या चाहत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. अलिकडेच आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात प्री रिलीज इव्हेन्ट पार पडला. त्यावेळी चाहत्यांची अलोट गर्दी लोटली होती. त्याच्या नावाचे बॅनर्स, कटआउट आणि फोटो मिरवत चाहते कार्यक्रमात सामील झाले होते.

हेही वाचा -

  1. 'भविष्यासाठी काउंटडाउन सुरू': प्रभासने 'कल्की 2898 एडी' रिलीजची तारीख केली जाहीर
  2. 'अन्नपूर्णी'तील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल
  3. 'अन्नपूर्णी'तील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details