मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री मधुबालाच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मधुबालाची धाकटी बहीण मधुर ब्रिज भूषण हिने 'शक्तिमान' निर्मात्यांसोबत या बायोपिकसाठी हातमिळवणी केली आहे. मधुर ब्रिज भूषण म्हणते, "माझ्या लाडक्या बहिणीसाठी काहीतरी करायचं हे माझं दीर्घकाळापासूनचं स्वप्न होतं, जिने खूप लहान पण क्षणिक आयुष्य जगलं. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी आणि माझ्या सर्व बहिणींनी हातमिळवणी केली आहे. देवाच्या आशीर्वादाने, आणि माझे भागीदार, अरविंदजी, प्रशांत आणि विनय यांचे समर्पण यासाठी लाभले आहे. मला विश्वास आहे की हा बायोपिक एका भव्य स्तरावर यशस्वीपणे साकारला जाईल. हा प्रकल्प सुंदरपणे साकारण्यासाठी आम्हाला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे."
ती पुढे म्हणाली, "माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे की - फिल्म इंडस्ट्रीतील आणि बाहेरील - माझ्या परवानगीशिवाय माझ्या बहिणीच्या जीवनावर आधारित बायोपिक किंवा इतर कोणत्याही प्रकल्प बनवण्याचा प्रयत्न करू नका."