मुंबई : निर्माता मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांच्या लग्नाचे रिसेप्शन रविवारी झाले. या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मोठ्या संख्येने सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत सर्वांच्या नजरा या अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझादवर होत्या. या रिसेप्शनमध्ये हृतिक आणि सबा एकत्र आले होते. या कार्यक्रमासाठी हृतिकने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता तर सबाने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. याशिवाय तिने केसांना वेणी घालून, मोठा मांग-टीका आणि उंच स्टिलेटो घातले होते. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. हृतिक आणि सबा एकत्र पोझ देतांना फार आकर्षिक वाटत होते.
आमिरने नवविवाहित जोडप्यासाठी गायले गाणे :या जोडप्याची केमिस्ट्री बघून चाहते फार आश्चर्यचकित झाले. फोटोग्राफर्सना पोझ देण्यापूर्वी हृतिकने सबाकडे प्रेमाने पाहिले आणि हसत हसत तिच्याशी बोलला. तसेच त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटले, 'सोबत तुम्ही छान दिसता'. तर दुसर्याने लिहिले, ते खूप आनंदी दिसत आहेत, देव आशीर्वाद देवो' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर आल्या आहे. दुसरीकडे, या कार्यक्रमात अभिनेता आमिर खान हा पांढऱ्या कुर्ता पायजामामध्ये आला होता. आमिरने नवविवाहित जोडप्यासाठी गाणे म्हटले एका व्हिडिओमध्ये आमिर इरा शेजारी बसून 'पल पल दिल के पास' गाताना दिसत आहे. मधुने 'गजनी', 'अग्ली' आणि 'क्वीन' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.