नवी दिल्ली- ग्रहांच्या स्थानांवर आधारित पंचांग हे प्राचीन आहे असे ठरवून दुर्लक्षित करु नका. कारण याचा वापर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मार्स ऑर्बिटर मिशनला प्रक्षेपित करण्यासाठी केला होता, असे अभिनेता आर माधवन यांनी रविवारी सांगितले. त्याच्या या विदानानंर त्याला ऑनलाईन टीकेला सामोरे जावे लागले आहे.
गेल्या आठवड्यात चेन्नई येथे त्याच्या आगामी 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये, माधवन म्हणाला होते की 'पंचांग'मध्ये ग्रहांच्या स्थानावरील गणनांचा खगोलीय नकाशा आहे, त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कशा कार्य करतात, त्याचे परिणाम, सौर ज्वाला, इ. जे 2014 मध्ये मार्स ऑर्बिटर स्पेसक्राफ्ट कक्षेत घालण्याच्या दिशेने काम करताना वापरले होते.
कार्यक्रमाचा एक व्हिडिओ आठवड्याच्या शेवटी सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये अनेक युजर्सनी अभिनेत्याला प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर त्याला उत्तर देताना माधवनने ट्विट केले: "पंचांगला तमिळमध्ये 'पंचांग' म्हणण्यासाठी मी याला पात्र आहे. तरीही मंगळ मोहिमेत फक्त 2 इंजिनांच्या मदतीने जे काही साध्य झाले ते स्वतःच एक विक्रम आहे. नंबियन ऑफिशयल विकास इंजिन हे रॉकस्टार आहे."